पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०५ असावे व या शिष्टमंडळाने या सर्वधर्मीय शिष्टमंडळांत आपला एक प्रतिनिधि पाठवावा. एकंदर गांवची दीनवत्सलता या सभेच्या मार्फत चालावी. प्रत्येक धर्माचे स्वतंत्र अन्नछत्र, सदावर्त, रुग्णालय असले तर चालेल, पण सर्वधर्मीय सदावर्त, अन्नछत्र, रुग्णालय, रात्रीची शिक्षणसंस्था, सार्वजनिक उत्सव, व्याख्याने, स्वयंसेवक वगैरे या संस्थेच्या ताब्यात असावीत. याप्रमाणे सर्व हिंदुस्थानाच्या आकांक्षा एकत्र करणारी, सर्व हिंदी लोकांना सारखे लेखणारी अशी ही संस्था मोठी लोकोपयोगी होईल. जगांतील सर्व धर्माचे तुलनात्मक अध्ययन करण्याची ही संस्था एक केंद्र होईल. सर्व धर्मगुरूंना एकत्र करून, विचारविनिमय करून, परधर्मसहिष्णुता उत्पन्न करण्याला व वाढविण्याला या संस्थेचा फार उपयोग होईल. त्याचप्रमाणे या संस्थांनी सार्वजनिक विश्रामस्थाने (Parks), क्रीडास्थाने (Play grounds), नाटकगृहे, संग्रहालये (Museums), शोधभांडारे ( Invention galaries ) व दुसऱ्या असल्या सार्वजनिक ज्ञान व मनोरंजन करणाऱ्या संस्था आपल्या देखरेखीखाली घ्याव्यात, वाचनालये (Reading rooms), पुस्तकसंग्रह (Libraries), यंत्रसंग्रह (Machine workshops). नमुन्याची कोठारें (Stores of models) अशा संस्था देखील या मंडळाच्या हातांत देण्यास हरकत नाही. याप्रमाणे निरनिराळे धर्म व पंथ यांची एकजूट, एकमुख व एकदृष्टि होण्याचे हे मोठे साधन होऊन सर्वांची एकवाक्यता करण्यास उपयोगी पडेल. सार्वजनिक स्वच्छता हे या सर्व धर्मसंस्थांचे एक प्रमुख अंग केले पाहिजे. म्युनिसिपालिटी घराच्या चार भिंतीबाहेरील स्वच्छतेवर नजर ठेवील पण धर्माला माणसाच्या शरीरांतील गुह्य भागापर्यंत जाता येईल व म्हणून हे काम त्यानेच अंगावर घेतले पाहिजे. रोज एकदा तरी स्नान करणे, घर झाडून सारवून स्वच्छ ठेवणे, रोज मोऱ्या धुणे, पाणी गाळून पिणे, धान्य नीट निवडून सडून चाळून खाणे, लघवी वगैरे नियमित जागीच -घाण वगैरे येणार नाही अशी खबरदारी घेऊन-करणें, केरकचरा दिवसभर एका कोपऱ्यांत व दिवसांतून एकदां अगर दोनदां कचऱ्याच्या कुंड्यांवर टाकणे, मुलांना बसण्यासाठी उचलून ठेवता येतील असे शौचकूप करणे, त्यावर ताडबतोब राख किंवा माती टाकणे, ओल आलेल्या