पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०६ ठेवली आहे, त्यामुळे द्रव्य, आरोग्य वगैरेत त्यांचा कसा फायदा झाला आहे हे सर्वांना समजून द्यावें व सर्वांना तसे करण्यास उत्तेजन द्यावे. निव्वळ बाजरी खाऊन, थोडे कपडे वापरून निरोगी व सशक्त कसे राहाता येते हे नमुनेदार माणसांच्या प्रदर्शनाने दाखवावें, सशक्त माणसांस, निरोगी माणसांस बक्षिसे द्यावी, त्यांची चरित्रे प्रसिद्ध करावी. थोड्या खर्चात, थोड्या वेळांत, थोड्या श्रमांत स्वयंपाक कसा करावा व आनंदांत कसे रहावे हे उदाहरणाने शिकवावें. ____ मुलींच्या शिक्षणांत विशेषतः ही भाडी घासणे, धुणी धुणे, स्वयंपाक करणे, लोणची, पापड करणे वगैरे गोष्टी शिकविल्या पाहिजेत. मुलींना ही घरकामे थोड्या खर्चात, थोड्या वेळांत, थोड्या श्रमांत कशी करावी, उरलेला वेळ घरचे उत्पन्न वाढविण्यांत, सार्वजनिक कामें करण्यांत, देशाच्या हिताकडे लक्ष घालण्यांत कसा खर्च करावा व लहान मुलांना देशप्रीति, स्वदेशाभिमान वगैरे कसा शिकवावा हे शिकविले पाहिजे. या गोष्टी त्यांना अत्यंत उपयोगी आहेत. या कामांत हल्ली बायकांचे बहुतेक सर्व आयुष्य खर्च होते. यापैकी जर काही काळ किंवा श्रम वांचले तर राष्ट्रीय कार्याकडे त्यांचा किती तरी उपयोग होईल. मुलांना राष्ट्रीय कामाचे बाळकडू घालणे हे आयांचे मुख्य कर्तव्य आहे व हे या जितक्या उत्तम त-हेने बजावतील तितके देशाचे हित जास्त होणार आहे. लहानपणापासून प्रत्येक मुलाला हा माझा स्वदेश व या स्वदेशासाठी माझ्या आईबापांनी अमुक केले व मी अमुक करीन अशी भावना उत्पन्न झाली तर तीच भावना मोठेपणीं दृढ होते व अनेक मोठमोठी कामे करण्यास उत्तेजन देते. बायकांनी चालविलेल्या लायबऱ्या, वाचनमंदिरें, कारखाने, दुकानें, शाळा वगैरे असून त्यांतील सर्व व्यवहार फक्त बायकांनीच चालवावे. बायकांनी बायकांसाठीच चालविलेल्या गिरण्या असाव्या. हल्ली अनेक लहानमोठी यंत्रं झाल्यामुळे शारीरिक श्रमाचे व जोरदार स्नायूंचे काम फारसे उरले नाही व यामुळे स्त्रीपुरुष भेद संपुष्टांत येत चाललेला आहे. सर्व मनुष्यमात्रांना एका पायरीवर आणण्यास यंत्रशास्त्राने फार मदत केली आहे. सबब ज्यांना मुले बाळे नाहीत व नकोत अशा विधवा वगैरे बायकांनी, पुरुषांनी करावयाची कामें स्त्रियांसाठी करणे सोईचे होईल. शस्त्रक्रिया, वैद्यक, कीर्तन, पुराण, स्वयं