पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धार्मिक तयारी (५) सर्व लोकांचे निरनिराळे देव, हे सर्व एकाच परमात्म्याची निरनिराळी रूपे आहेत. त्या त्या विविक्षित देशाला, काळाला, परिस्थितिला अनुरूप अशी रूपे असून ते धर्मग्रंथ देखील याचप्रमाणे परिस्थिति-सापेक्ष आहेत. यासाठी सर्व देव व सर्व धर्मग्रंथ - प्रत्येकाने सारखेच पूज्य मानावे व या पैकी कोणाचाहि अपमान तो सर्वांचा अपमान होय. या धर्मतत्वांवर हिंदुस्थानांतील सर्व लोकांचा व्यवहार आपआपल्या पंथाप्रमाणे चालावा. कोणाहि पंथाला जास्त अगर कमी हक्क वगैरे नसावेत. सर्वच धर्ममंदिरांवरून इतर धर्मीयांनी वाजवीत जाऊ नये. त्या मंदिराचा मान सरकारी कचेऱ्या वगैरेप्रमाणे यायोगाने ठेवावा, प्रत्येक धर्ममंदिरांत त्या त्या धर्मपंथाच्या लोकांस पूर्ण स्वातंत्र्य असून इतर धर्मपंथीयांनी ते लोक त्या मंदिरापुरते जे नियम करतील ते निमूटपणे पाळले पाहिजेत; जसा प्रत्येक इसम आपल्या घरांत स्वतंत्र व वाटेल ते करण्यास मुखत्यार आहे व त्या घरांत जाणाऱ्या प्रत्येकाने त्याच्या मर्जीप्रमाणे वागले पाहिजे; त्याचप्रमाणे प्रत्येक धर्मपंथीय लोक आपल्या धर्ममंदिरांत स्वतंत्र असून इतर धर्मीयांनी त्या मंदिरांत त्यांच्या मनाप्रमाणे वागले पाहिजे, सर्वधर्मीयांना सारखी मोकळीक अशी पाहिजे तर नवीन धर्ममंदिरे स्थापावी व त्यांत सर्वसामान्य गोष्टींसाठी सर्व धर्मीयांनी एकत्र प्रार्थना करावी. पर्जन्य, रोग, लढाई वगैरे सर्वसामान्य आपत्तींसाठी या मंदिरांतून प्रार्थना वगैरे व्हाव्या व या प्रार्थना वगैरेंत सर्व लोकांनी भाग घ्यावा. स्वराज्यप्राप्तीसाठी लागणाऱ्या प्रार्थना, वगैरे बाबी या धर्ममंदिरांत होतील, अनाथांस अन्नवस्त्र, रोग्यांस औषध व पथ्य, अशिक्षितांस फुकट व रात्रीचे शिक्षण अशा धर्ममंदिरांमार्फत देण्यात यावे. तात्पर्य, सर्व हिंदवासीयांना एकत्र करण्याचे, एकीने काम करण्यास शिकविण्याचे हे साधन असावे. __ या धर्ममंदिराचे चालक सर्व धर्माचा एक एक प्रमुख गृहस्थ असावा. याची शाखा दर जिल्ह्यास एक असावी व धर्मा धर्मात लढा पडला तर तो या सभेमार्फत मोडावा. कोणतेहि दयाधमाचे काम की ज्यांत सर्वधर्मीयांचा समावेश करावयाचा असेल त्याचे आचरण या धर्ममंदिरामार्फत व्हावें. प्रत्येक धर्माच्या लोकांचे दर गावांत, दर जिल्ह्यांत एक शिष्टमंडळ