पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०५ तर फिरून तो सोडण्याची बुद्धि सुद्धा होऊ नये अशा प्रकारची शिक्षा असते. औषध घेतल्याने रोग जाईल पण फिरून रोग होतो. निदान तो रोग होऊ नये अशी शक्ति औषधांत नाही. ती धर्मात आहे. धर्म हा याप्रमाणे सर्व शास्त्रांपेक्षांहि थोर आहे. धर्मात सर्व शास्त्रांचा, सर्व व्यवहारांचा, सर्व कर्माचा अंतर्भाव होईल; पण धर्माचा अंतर्भाव दुसऱ्या कशांतहि होणार नाही इतका तो श्रेष्ठ, व्यापक व सर्वशक्तिमान आहे. यासाठीच कोणत्याहि गोष्टीचा विचार करण्यापूर्वी धर्माचा विचार केला पाहिजे. याप्रमाणे तात्विक धर्म जरी सर्वव्यापक आहे तरी त्याचा इतका व्यापक विचार ( राजकारण व स्वराज्यसंपादन याचा विचार करतांना ) करण्याचा येथें जरूर नाही. स्वराज्यसंपादन म्हटले म्हणजे त्यांत पुष्कळ गोष्टी गृहीत घरल्या जातात व त्यामुळे त्या गृहीत गोष्टींना अनुसरून धर्माचा विचारहि मर्यादित व संकुचित होतो. निरपेक्ष धर्मविचारापेक्षा हा सापेक्ष धमविचार फारच लहान असतो. स्वराज्य म्हटल्याबरोबर सुयंत्रित समाज, त्याचा विविक्षित मांडणी, त्याची एक प्रकारची राज्यपद्धति इतक्या गोष्टी सहजच येऊन गेल्या व या गोष्टींना अनुसरून, या गोष्टी विचारात घेऊन धमाच विवेचन या वेळी केले पाहिजे. हिंदुस्थानांत अनेक घर्मांची-नव्हे धर्मपंथाचासरमिसळ झालेली आहे, यासाठी सार्वजनिक धर्माचा विचार करताना या सर्व धर्माची ज्यांत एकवाक्यता होईल इतक्या गोष्टींचा विचार करून यांतील भेदांचा किंवा विशिष्ट तत्त्वांचा विचार त्या त्या धर्मपथाय लोकांकडे सोपविला पाहिजे. या सर्व धर्मपंथांतील सामान्य अशी तत्वे खाली दिलेली होत, (१) परमात्मा सर्वव्यापी व सर्वांचा नियंता आहे. (२) सर्व प्रजा त्याची लेकरें आहेत, म्हणून कोणत्याहि त्याच्या लेकरास त्रास दिल्यास त्यास त्यापासून वाईट वाटते व त्रास देणाराचा राग येतो. (३) नियमितपणे त्याची आठवण ठेवून त्याचे हकमांत वागणे त्याला आवडते व हेच माणसाचे कर्तव्य, (४) आपण जे कर्म करूं त्याचे फळ आपणांस भोगावे लागते. यात - केव्हांहि तफावत होत नाही.