पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धार्मिक तयारी स्वराज्यसंपादनांत धार्मिक तयारीला अग्रस्थान दिलेले पाहून कित्येकांना आश्वर्य वाटेल. पण धर्म हा राजकारणापेक्षा सर्वतोपरी श्रेष्ठ आहे हे या लोकांनी लक्षात ठेवावें. जगांत एकच मनुष्य असला तर त्याला राजकारणाची जरूर पडणार नाही पण त्यालाहि धर्म हा राहणारच. धर्म हा फक्त माणसामाणसांतील व्यवहारांचाच विचार नसून माणसाचा जनावरांशी, झाडांशी, निर्जीव वस्तूंशी, अदृश्य व अगोचर वस्तूंशी देखील माणसांनी कसे वागावे हे सांगतो. फार काय, पण सृष्टीचा मूळ उत्पादक जो परमात्मा त्याशी देखील कसे वागावें हे शिकवितो व यासाठी राजकारणापेक्षां तो किती तरी व्यापक व गहन आहे. राजकारण हे हिंदी धर्मशास्त्रकारांच्या मते धर्माचे एक अंग किंवा सहावा हिस्सा आहे. धर्म हा. राजकारणाच्या अगोदर जन्मास येऊन राजकारणाचे काम नाहीसे झाले तरी धर्माचे काम संपत नाही. धर्म हा अनंत व अनादि आहे. तो इहलोकाचाच तेवढा विचार करतो असे नव्हे तर तो परलोकाचाहि विचार करतो. तो देश, काल, परिस्थिति यांनी मर्यादित नाही. अमुक अवस्थेत धर्म नको असे होत नाही. धर्माची शाक्त माणसाच्या शरीरावरच चालून थांबत नाही; ती माणसाचे मन वगैरेवरच काय पण प्रत्यक्ष जीवावर चालते. इतकी धर्माची थोरवी आहे. राजकारण त्याच्या पासंगाला सुद्धा लागणार नाही. धर्माचे व्यवहार नित्य व निश्चित आहेत. मात्र नाधर्मश्चरितो लोके सद्यः फलति गौरिव ॥ पुनरावर्तमानस्तु कर्तुर्मूलानि कंतति ॥ मनु ॥ धर्म सोडला तर तो तत्काळ शिक्षा करीत नसतो. त्याची शिक्षा खात्रीने होते; पण ती सावकाश होते. व त्या शिक्षेत त्या धर्म सोडण्याच्या प्रवृत्तीचें मूळ सुद्धां तो जाळून टाकतो. धर्म सोडल्याबद्दलची शिक्षा एकदां भोगली