पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र.६ आपणांस संपादन केली पाहिजे, अशी योग्यता नसेल तर या दगडासारख्या जड हिंदुस्थानाला वर काढण्यास कोणता पोहणारा धजणार आहे? ही हिंदुस्थानची धोंड किती भारी आहे याचा इंग्रजी साम्राज्याला गेल्या महायुद्धांत चांगला अनुभव आला व म्हणूनच हे मढे निदान आपल्या पायावर उभे राहील असे करावे असे त्यास वाटते व या वाटण्याचा फायदा घेऊनच आपण हात हालवावयाला लागले पाहिजे,