पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपोद्घात मा धार्मिक, सामाजिक, शिक्षणविषयक व शेती, उद्योगधंदे व व्यापार या बाबींत आपण पुष्कळ सुधारणा केल्या पाहिजेत व या सुधारणा करण्यासाठी जिवापाड मेहनत घेतली पाहिजे. हल्लीच्या तरुण पिढीवर अत्यंत मोठी जबाबदारी आहे, त्या पिढीच्या कसोटीची ही वेळ आहे. अशी संधि नेहमी येत नसते. अंगांत कांही त्राण आहे तोंच काही तरी होईल, क्षयरोग एकदां बळावला म्हणजे तो असाध्य आहे, यासाठी जे कांहीं करणें तें आजच व मनःपूर्वक केले पाहिजे, ही गोष्ट वाचकांच्या मनांत बिंबवावी हा हे पुस्तक लिहिण्यांत उद्देश आहे. दिवसेंदिवस हिंदुस्थानाची स्थिति क्षयरोग्याप्रमाणे होत चालली. रोज थोडा थोडा शक्तिपात होत आहे. जगांतील इतर राष्ट्रांत व हिंदुस्थानांत पडणारे अंतर वाढत आहे. जगांत मोठी यादवी किंवा न भूतो न भविष्यति असा उलथापालथीचा प्रकार घडला तरी हिंदुस्थाना इतके हीनबल जग होणे शक्य नाही व असे आहे तर हिंदुस्थानाचे पारतंत्र्य पण जाणे शक्य नाही. ग्रीक आले, कांही काळ राहिले, गेले, शक वगैरे मुसलमानांनी धक्के मारून देश खिळखिळा केला. पुढे मोंगल आले; कांही काळ राज्य करून लयास गेले, नंतर जरा स्वराज्याची झुळुक लागली. पण जाग उत्पन्न होणार तोच ती ज्योत विझली. आतां इंग्रज राज्य करीत आहेत. अशा रीतीने अनेक उलथापालथी झाल्या तरी त्यांत हिंदुस्थानास काय होय ? त्याच्या कपाळाची कर्मकटकट संपत नाही. त्याची संस्कृति वर न येतां दिवसेंदिवस नाहीशीच होत आहे व मिसर, मेक्सिको, असीरिया, ग्रीस, रोम प्रमाणे हिंदी संस्कृति देखील नामशेष होऊन देशाच्या जमीनीला महद्भाग्य प्राप्त होईल! पण त्यांत आपणांस अभिमान बाळगण्यारखें काय होईल? यासाठी जगांतील उलाढालींनी (आपणांस कष्ट, सायास, स्वार्थत्याग वगैरे केल्याशिवाय ) आपोआप चांगले दिवस येतील असा कोणास भ्रम असेल तर ती मोठी चूक आहे. __या तयारीखंडांत सांगिल्याप्रमाणे तयारी कांही एका क्षणांत होणार नाही. चिकाटीने व नेटाने प्रयत्न केले तर दहावीस वर्षांत ती होईल व अशी तयारी झाली म्हणजे जगांतील उलाढालीचा आपणांस फायदा घेतां येईल. जगांत कोणी तरी आपणांस विचारील इतकी तरी योग्यता