पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

थे.] इष्ट सुधारणा ढकलावे तितकी त्यावर चक्रवाढ व्याजाने रक्कम फुगत जाणार हे आपण विसरता कामा नये, जगांत ब्रिटन व हिंदुस्थानच काय पण असली दहाराष्टे राहण्यास-सुखाने राहण्यास-वाव आहे. समाज व व्यक्ति यांचा जो संबंध तोच जग व राष्ट्र यांचा आहे. समाजांतील व्यक्ति स्वतंत्र व संपन्न झाल्याने जसें समाजाचे हित होते तसेच राष्ट्र स्वतंत्र व संपन्न झाल्याने जगाचे कल्याण होते. समाजांत ज्याप्रमाणे एकादी व्यक्ति स्वतंत्र व संपन्न झाल्याने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे काही काळ नुकसान झालेसे वाटते, गुलामाला स्वातंत्र्य दिल्याने त्या गुलामाच्या मालकाचे नुकसान झाले असे दिसते पण तो गुलाम असतांना जितकें व जसे काम करीत असतो त्यापेक्षां तो स्वतंत्र झाल्यावर जास्त चांगले व पुष्कळ काम करू लागल्याने एकंदर समाजाचे कल्याणच होते व यासाठी एका मालकाच्या हिताहिताकडे न पाहतां गुलामगिरी बंद करावी असेंच समाज ठरवितो; त्याचप्रमाणे एक देश स्वतंत्र व संपन्न झाल्याने जरी दुसऱ्या एका देशाचें तात्कालिक नुकसान झाल्यासारखे दिसले तरी हा स्वतंत्र व संपन्न देश जगाच्या उत्पन्नांत जी भर घालतो त्याने एकंदरीत सगळ्या जगाचें कल्याणच होते व यासाठी शहाण्या माणसांनी या स्वातंत्र्येच्छु देशाला शक्य ती मदत करावी. ब्रिटनची परंपरा या गोष्टीला अनुकूल अशी आहे. इतालीसारखे देश स्वतंत्र होण्याला ब्रिटनने मदत केली आहे व त्याचप्रमाणे आपण आपली तयारी करूं लागलों, केवळ शाद्विक नव्हे तर सक्रिय तयारी करूं लागलों, तर ब्रिटन आपणास मदत करील असा अंदाज करण्यास हरकत नाही. मात्र आपण त्या मदतीसाठी अडून बसू नये. लावी पक्षीण व तिची पिलें ही गोष्ट लक्षात ठेवून वागावे म्हणजे झाले. भा...हिं...स्व...६