पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य स्वराज्य पाहिजे असे आम्ही हिंदी लोक म्हणतो, स्वराज्याला आम्ही लायक आहोत असे प्रतिदिन सुद्धा करतों; पण आमची वागणूक मात्र आम्ही प्रातिनिधिक संस्थांना लायक आहोत असे दाखवीत नाही व यावरून आमचे भावी स्वराज्य प्रातिनिधिक स्वरूपाचे नसावे असे वाटू लागते. पण खरे पाहिले तर आमचे स्वराज्य प्रातिनिधिक स्वरूपाचेच आहे. पण आम्ही त्याला अद्याप योग्य झालों नाही. ते आम्हांला पाहिजे हेहि खरें व यासाठी आम्ही ताबडतोब तयारीला लागून ते मिळविण्यांत यश संपादन केले पाहिजे. या कामी आपणास जपानचे उदाहरण कित्ता गिरविण्यालायक आहे. जपानी लोकांना एकदां प्रातिनिधिक स्वराज्य पाहिजे असे वाटल्याबरोबर राजाने राज्य, जहागीरदारांनी जहागिरी, सामुराई लोकांनी आपले श्रेष्ठत्व, जनतेने आपले व्यक्ति स्वातंत्र्य व सर्वांनी आपले लक्ष त्या कामी वाहिले. इतकी एकवाक्यता होतांच जगांत ज्याला उपमा नाही असे स्थित्यंतर पांच चार वर्षांत घडून आले व वीस वर्षांत ते कसोटीस उतरून जगाच्या पसंतीचा छाप त्यांवर पडला. हीच गोष्ट हिंदुस्थानाची व्हावी असें मनापासून वाटते. या कामी विलायतच्या लोकांनी व सरकारांनी जर व्यापार व उद्योग धंदे वाढविण्याच्या बाबतीत मनःपूर्वक मदत केली तर त्यांत दोन्ही देशांचे हित होईल. या दोन देशांची दोस्ती इतकी दृढ होईल व यांचे सामर्थ्य इतके वाढेल की, या संयुक्त राष्ट्राला जगांतील सर्व रा, हार जातील. संयुक्त अमेरिका, संयुक्त ब्रिटन व संयुक्त हिंदुस्थान म्हणजे जगाचा राष्ट्र - संघ होईल व फिरून पृथ्वीवर कृत्युग झाले असे दिसेल. अशा संयोगाने आपले नुकसान होईल असे कित्येक ब्रिटिश मुत्सद्यांना वाटत असे, पण ही त्यांची चूक होती असे महायुद्धाने सिद्ध केले आहे. हिंदुस्थानाचे उत्पन्न वाढले तर सगळ्या जगाचंच हित होणार आहे. शेतकरी, कारखानदार, आडते, व्यापारी व गि-हाईक या सर्वांचेच या उत्पन्नापासून हित आहे. हिंदुस्थानचे धनोत्पादन पोटापाण्याचे आहे. चैन चे नाही व यासाठी त्यापासून सगळ्या जगाचे हितच होईल असे खात्रीने म्हणता येईल. काही काळ प्रारंभी ब्रिटनचे नुकसान झाल्यासारखे दिसेल पण ते आजपर्यंत जी डोळेझांक करण्यांत आली तिचे प्रायश्चित्त होय. हे प्रायश्चित्त जितके लांब