पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

थे. ] ... । इष्ट सुधारणा ही शिकन हिंदुस्थानांत रूढ केली पाहिजेत. याप्रमाणे शक्य तितके प्रकार प्रचारांत आणून हिंदुस्थानाचा उत्कर्ष व्हावा म्हणून प्रत्येक जाणता माणूस झटेल तर हिंदुस्थानाची सुस्थिति लांब नाही. अज्ञानी माणसें तर या हिशेबांतून गाळलीच आहेत. पण जे आपणांस समंजस म्हणवितात त्या शेकडा पांच सातांनी तरी आपल्या समजुतीप्रमाणे, विचारपूर्वक मनोभावाने कामें केली पाहिजेत असे म्हटले तर ते गैर होईल काय ? इतकी शहाणी माणसे मुद्धां जर असे मनोभावाने देशाच्या उद्धारासाठी झटणार नसतील तर मग प्रातिनिधिक संस्थांची मागणी व इच्छा करण्यांत अर्थ तरी काय ? प्रातिनिधिक संस्था शेकडा दहापांच माणसांनी तरी त्यांत लक्ष घालून काम केल्याशिवाय नीट चालणार नाहीत व ही स्थिति म्युनिसिपालिट्यांतून आपणांस पाहण्यास सांपडतेच. म्युनिसिपालिटीचे प्रतिनिधि काम बरोबर पहात नसल्याने ती एक नोकरशाहीच झाली आहे. चीफ आफीसर वगैरे करतील ती पूर्वदिशा अशी मुनिसिपालिट्यांची हल्ली स्थिति आहे. म्युनिसिपालिटीतील सभासदांनी खुर्चीवर बसून (प्रत्यक्ष स्थितीशी अगदी विसंगत असे) वाटेल ते ठराव करावे व म्युनिसिपल नोकरांनी आपल्या तब्बेतीस लागेल तशी अंमलबजावणी करावी ! ठराव काय व त्याची बजावणी कशी हे जर कोणी पहावयाचंच नाही तर मग असा गोंधळ झाला तर आश्चर्य कसले ? असा गोंधळ झाला नाही तरच आश्चर्य. मतदारांना काम नको, प्रतिनिधींना काम नको, नोकरांना काम नको, सर्वो-नांच काम नको मग उपाशी राहून स्वस्थ मरावें हे ओघानेच प्राप्त होते. हिंदुस्थानाच्या लोकांची पुढची दहा वर्षे म्हणजे अगदी आणीबाणीची व कसोटीचीच वेळ आहे. ही कसोटी सर्व माणसें व सर्व संस्था यांची चांगली छाननी करणार आहे. हिंदुस्थानच्या लोकांत दूरदृष्टि, जोम व व्यवस्था किती आहे हे आतां चांगल्या रीतीने निदर्शनास येणार आहे. निरनिराळ्या जातींत, धर्मात, लोकांत सभेट ठेवणे, एकीने व व्यवस्थेने कामें करणे व सरकार में काम करते त्यांत असलेल्या उणीवी आपण स्वावलंबनाने भरून काढणे, ही कामे करण्याची पात्रता हिंदुस्थानांत किती आहे हे दिसेल. ही परीक्षा जितक्या चांगल्या प्रकारे हिंदुस्थान पास होईल तितकी ते आपली स्वराज्याची लायकी सिद्ध करील, आजमितीला आम्हांला