पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० ४ भाग सहज बाजूला सारतां येतो. थोडेच जर बहुमत असले तर ती गोष्ट निःसंशय जनतेला पटली असे म्हणता येणार नाही. कारण तटस्थ लोकांचा जो पक्ष तो कोणत्या बाजकडे शेवटीं झुकेल हे ठाऊक नसल्याने हे थोडे बहुमत वास्तवीक निर्णायक नव्हे. पाऊणशे व पचवीस अशी मते झाली म्हणजे तटस्थ लोकांची मते दुसऱ्या बाजूकडे पडली तरी पासष्ट व पस्तीस असे फारतर मतांचे प्रमाण पडेल व काही झाले तरी पाऊणशेकडे निःसंशय बहुमत आहे असे म्हणता येईल. यासाठी प्रत्यक्ष आचरणाचे ठराव तीनचतुर्थांश मताने मंजूर झाले पाहिजेत, असे साधारण तात्विक विवेचन सांगते. पण आपण आपल्याकडे एकमताने मंजूर झालेले ठराव देखील आचरणांत येत नाहीत असे प्रत्यक्ष पाहतों! यावरून इतकेच समजावयाचें की, हिंदुस्थानांतील लोक फार भिडस्त असून ते भिडेने, आपल्या हातून काय होईल काय होणार नाही, आपण काय करण्यास तयार आहों वगैरे विचार न करतां मते देतात. तसेच पुढारी निवडतांना खरा पुढारी कोण वगैरे न पाहतां जो हाताशीं सांपडेल त्याला पुढारी नेमतात. लोक मनोभावाने काम करीत -नाहीत म्हणून चांगली माणसें घुढारी व्हावयालाहि नाखूष असतात. प्रतिनिधींना घरोघर जाऊन मतांची भिक्षा मागावी लागते व स्वाभिमानी माणसांना हे करणे कठीण जाते. मतदार व प्रतिनिधी यांची ओळख असावी; पण प्रतिनिधीने प्रत्येक मतदाराकडे गेलेच पाहिजे, एरवी त्यास मत देऊ नये असे म्हणणे म्हणजे तोंडपुजेपणाला उत्तेजन देणे होय. तात्पर्य, आपण आजपर्यंत जें राष्टकार्य करीत आलो त्यांत दाखविण्यासारखें काम झाले नाही याचे कारण जनता अद्याप तयार झाली नाही हे होय व हे जनता तयार करण्याचे काम आपण पहिल्याने हाती घेऊन केले पाहिजे, FREE ' या पुस्तकांत सांगितल्याप्रमाणे संघस्थापनेपासून प्रारंभ करून हिंदु-स्थानाचे मनुष्यबळ य साधनसंपत्ति यांचा राष्ट्रीय कामांकडे पूर्ण उपयोग करण्यास आपण शिकले पाहिजे, लोकांना सर्वसाधारण व औद्योगिक ज्ञान जास्त दिले पाहिजे. सहकारी संस्था काढून धंदे करण्यास उत्तेजन किंबहुना सक्ती सुद्धा केली पाहिजे, अगदी नवीं साधने व यंत्रे यांचा योग्य उपयोग उत्पन्न वाढविण्याकडे केला पाहिजे. परदेशी कला व व्यवस्था