पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इष्ट सुधारणा ग - याप्रमाणे स्वदेश व परदेश यांची माहिती मिळवून एक कार्यक्रम ठरला म्हणजे त्या कार्यक्रमाला अनुकूल असे लोकमत तयार केले पाहिजे. त्याच त्याच बाबीचा अनेक वेळां जनतेपुढे उहापोह झाला, त्या बाबींच्या गुणदोषांचे नेहमी उद्घाटन झाले, त्यावर करावयाच्या उपायांची अनेकदा चर्चा झाली म्हणजे लोकमत त्या बाबींना अनुकूल होत असते. सरते शेवटी लोकांना आंखून दिलेल्या मार्गाप्रमाणे कामे करण्यास उद्युक्त करण्यासाठी पुढाऱ्यांनी भाषणे, व्याख्याने, वर्तमानपत्रांतील लेख व आपले स्वतःचे आचरण यांनी लोकांत चैतन्य आणले पाहिजे. चिंच खातांना पाहून जसे पाहणाराचे तोंडाला पाणी सुटते त्याप्रमाणे पुढान्याचे वर्तन पाहून, तसे आचरण करण्याचे, इतरांच्या अंगी फुरण आले पाहिजे, असें आचरण करण्यासाठी जनतेत एका प्रकारचा जोम लागतो हे खरे; पण असा जोम नसण्याइतकी, मुळीच नसण्याइतकी, नेभळी किंवा नपुंसक जनता बहुघा सांपडणेच अशक्य. काही लोक जास्त उच्छंखल असतील.. कांहीं जास्त शांत असतील, इतकेंच. इतर राष्ट्रांच्या तुलनेने आपली स्थिति कशी आहे, हे ज्ञान एकदा जनतेला झाले म्हणजे त्याप्रमाणे आचरण करण्यास जनता माघार घेत नाही असा जगाचा अनुभव आहे. लोकांना प्रत्यक्ष आचरण करून दाखवून तो कित्ता त्यांना वळवावयाला लावले पाहिजे, अनुकरणाने लोक जसे वळतात तसे नुसते बोलणे ऐकून वळत नाहीत. याबाबद लोकांतील शैथिल्य जावे म्हणून लोकांचे भेदभाव बहुतेक नाहीसे करावे लागतात. पुष्कळ लोक अमक्याने अमुक केलें म्हणून आपण तसेंच करावे, म्हणून तसे करतात. पण कित्येक लोक अमुक माणसाने असे केलें इतक्याच साठी तसे करीत नाहीत व असे दोन पक्ष झाले म्हणजे कित्येक तटस्थ राहतात व काम बिघडते. यासाठी होताहोईतों शहाण्याने दोन मते-प्रबळ अशी दोन मते-होतील असें करूं नये. परमेश्वरसुद्धा असुरांना किंवा अधर्माला चांगला प्रबळ होऊ न देऊन सर्वांची त्यांच्या नाशाबद्दल एकनिष्ठा झाली म्हणजेच अवतार घेऊन त्यांचा नाश करीत असतो. जगांत जर त्यांच्या नाशाबद्दल दोन प्रबल मते झाली तर हे काम आपणांस कठीण जाईल ही जाणीव प्रत्यक्ष परमेश्वरापासून सर्वांना असते. या दोन प्रकारच्या मतांत ३ स १ असे भाग झाले म्हणजे ३ भागांना एक १