पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०४ पाहिजे. नुसते तात्विक ध्येय जनतेला ग्राह्य होत नाही व म्हणूनच वेदांताची तत्वे उत्तम, निर्विवाद, सत्य व अनेक थोर पुरुषांनी सांगितलेली अशी आहेत तरी ती लोकांच्या आचरणांत आलेली दिसत नाहीत. ती व्यावहारिक नाहीत म्हणून असे होते. - सार्वजनिक कामासाठी जशी सरकाराची एक संघटित संस्था आहे तशीच लोकांचीहि, तिला तोड देण्याइतकी, संवटित संस्था पाहिजे, सरकार जसें केवळ सार्वजनिक कामालाच वाहून घेतलेले आहे तसेंच याहि लोकसंस्थेची मंडळी केवळ सार्वजनिक कामाला वाहून घेतलेली पाहिजे, त्यांनी पहाणी करून, लोकांनी आपलों आपण करण्यासारखी कोणती कामे आहेत, याची जंत्री करावी. लोकांच्या गरजा काय आहेत, त्यांना कोणत्या गोष्टींची उणीव आहे हे पाहून त्या गोष्टी कशा साध्य कराव्या याचा विचार व चर्चा करण्यासाठी सर्व लोकांपुढे मांडावे, व या गोष्टी साध्य केल्याने सर्व देशाचे एकंदरीत कसे हित आहे हे लोकांस समजून देऊन त्यांच्या नजरेस आणावें. असे केल्याने लोकांना एकत्र विचार करण्याची गोडी लागेल व मग एकजुटीने कामें करण्याची बुद्धी होईल. याप्रमाणे सबंध देश म्हणजे एक चैतन्ययुक्त संस्था आहे असे प्रत्ययास येईल व असे झाले म्हणजेच त्या समाजाला राष्ट्रीयत्व आले, आपले आचार, विचार, सामर्थ्य यांचें, इतर देशांतील त्या त्या गोष्टीशी तुलनात्मक असे, अध्ययन केले पाहिजे. या अध्ययनांत कोणत्या कारणामुळे कोणती शक्ति उत्पन्न होते किंवा कोणतें दुर्बलत्व येते, इतर देशांत गुण व दोष कोणते, आपल्या देशांत गुण व दोष कोणते, या गुणदोषांचें तारतम्य, बलाबल किती, इतरांनी तसले दोष कसे घालविले व तसले गुण कसे वाढविले याचा विचार करून आपली स्थिति सुधारण्यास आपण काय केले पाहिजे याची एक जंत्री केली पाहिजे, अशी जंत्री तयार झाल्यावर -कोणती गोष्ट सुकर, कोणती गोष्ट अगोदर केली पाहिजे, कोणती गोष्ट आपली आपणास करता येईल, कोणत्या गोष्टीला दुसऱ्याचे किती सहाय्य पाहिजे, हे सहाय्य आपणांस कसे मिळेल या गोष्टींचा विचार केला पाहिजे. असा विचार करण्याचा या पुस्तकांत अल्पसा प्रयत्न केला आहे. '