पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इष्ट सुधारणा अधिकार व त्यांची अधिकार चालविण्याची पद्धत पाहून त्यांत लोकमताचा दाब कोठे, कसा व किती ठेवता येईल हे पाहिले पाहिजे. स्वराज्यांत में काम आपणांस पुढे करावे लागणार त्याची सर्व माहिती आजच संपादन करून तिजवर आपली छाप पाडली पाहिजे. स्थानिक संस्था सर्वस्वी आपल्या आहेत, तर त्या लोकांना पूर्ण सुखदायी झाल्या-नव्हे केल्यापाहिजेत. लोकांना काय पाहिजे, कोणती दुःखें आहेत, ती कशी जातील, यांचा विचार करून ती तर सर्वथैव आपण नाहीशी करूं अशी उमेद सर्व स्थानिक संस्थांतील सर्व प्रतिनिधींनी बाळगिली पाहिजे. नगराचे कल्याण करणाऱ्या प्रत्येक बाबींत सर्वांचे एकमत असले पाहिजे, म्हणजे या संस्था लोकांना फार सुखावह होतील व कामे करण्याची पद्धत लागेल. हिंदुस्थान आजपर्यंत सार्वजनिक कामांत फार मागे आहे याचे कारण देशहिताकरितां काय व कसे केले पाहिजे याचा कोणी चांगला विचारच केला नाही. तात्पुरती एखादी दुसरी बाब विचारांत घेऊन तेवढ्यापुरते काम करण्याकडेच बहुतेकांनी लक्ष दिले. पण राष्ट्रीय, व्यापक दृष्टीने विचार करून व्यवस्थित प्रकारची मांडणीच कोणी केली नाही व त्यामुळे जरी आज पन्नास वर्षे कांही तरी सार्वजनीक काम आपण करीत आलों तरी आढावा पाहतां आपणांस कांहींच मोठे काम दाखवितां येत नाही. सार्वजनिक बाबींचा विचार केवळ जनहिताच्याच दृष्टीने केला पाहिजे, त्यांत धरसोड अगर भीडभाड अगदीं उपयोगी नाही, तसेंच लोकांचा ओढा, त्यांची प्रवृत्ति व ऐपत यांचाहि योग्य विचार झाला पाहिजे. हे सर्व दोष बहिष्कारत्रयीत चांगले निदर्शनास आले, नुसता तात्विक विचार करून राष्ट्रीय कार्य होत नाही. त्यांत व्यवहार, प्रत्यक्ष सुखःदुख आजपर्यंतच्या संवई या लक्षात घेतल्या पाहिजेत. जनता ही पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे आहे. पाण्याचा प्रवाह फिरवावयाचा असेल तर लांबपासून हळु हळु थोडे थोडे वळण देत जावे तेव्हां तो फिरतो. तसें न केले तर प्रतिबंध करणाराला फोडून किंवा बगल देऊन तो आपला रस्ता धरतो. लोकमताची पण हीच स्थिति असते. ते हळू हळ व थोडे थोडे वळवीत गेले तर वाटेल तिकडे वळेल. पण त्याला एकदम वळवू म्हटले तर तसे होणार नाही. लोकांपुढे मांडावयाचे ध्येय स्पष्ट व त्यांना सहज समजेल असे