पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०४ आपण नीट विचार करू लागलों म्हणजे आपणांस असे दिसते की, इंग्रज लोक हिंदी लोकांच्या आळसाशिवाय किंवा हिंदी लोक झोंपी न जातील तर हिंदुस्थान केवळ जुलमाने किंवा हत्यारांच्या जोरावर ताब्यांत ठेवण्यास असमर्थ आहेत. कायदा अपुरा आहे ही गोष्ट सर्वमान्यच आहे. पण आहे त्या कायद्यांत काम करावयाला, सुधारणा घडवून आणावयाला व एकीने प्रयत्न करावयाला पुष्कळ वाव आहे. या पुस्तकांत विवेचन केलेल्या पद्धतीने काम करण्यांत जर आपण येती पांच वर्षे घालविली तर आपण अर्धे अधिक स्वराज्य मिळवू व संपूर्ण स्वराज्याची पात्रता सर्वांच्या निदर्शनास आणूं. आपण या प्रमाणे चिकाटीने व अंतःकरणपूर्वक खटपट मात्र केली पाहिजे, अशी सोन्याची संधी नेहमी येत नसते. परमेश्वर संधी एकदांच देतो व तिचा उपयोग केला नाही तर फिरून तशी संधी लवकर येत नाही व पुष्कळ काळ वायां जातो. तसे शहाण्याने केव्हांहि करूं नये. गेल्या शंभर वर्षात हिंदी लोक पुष्कळ गोष्टी शिकले व त्यांच्या आकांक्षाहि फार वाढल्या आहेत. सन १८१८ साली आपण मूर्ख, आपणांस राज्य चालवितां येत नाही, तेव्हां ते कोणाला तरी बक्षीस द्यावे, असे वाटत होते; त्याच्याऐवजी कोणी आम्हाला राज्य दिले तर ते आम्ही असे चालवून दाखवू की, लोकांनी पहात रहावे अशी उमेद हल्ली आली आहे. हिंदी लोकांची भांडणाची खोड जाण्यासाठी त्यांना इतर लोकांशी नौका, विमाने, सैन्य, व्यापार, उद्योगधंदे यांनी लढावयाला शिकविले पाहिजे, हिंदी लोकांची फाजील शक्ति आपसांत भांडण्यांत खर्च होते ती दुसऱ्यांशी भांडण्यांत गुंतविली पाहिजे. त्यांना इकडे तिकडे बघावयाला देखील फुरसत मिळू नये इतके कासांत जखडून टाकले पाहिजे. हिंदुस्थान सरकारचा व विलायत सरकारचा हिंदी कारभारांतील हात कमी करून हिंदी लोकांना कामे करण्यास जास्त वाव मिळाला पाहिजे. सरकार हा वाव देईपर्यंत लोकप्रतिनिधींनी खाती वांटून घेऊन त्याचे उत्पन्न, त्यांवरील अधिकारी, त्यांची कामें, त्यांचा खर्च, खर्च करण्याची पद्धति, त्या खात्यांत आपले बोट शिरकाविणे, निदान आपला वचक तेथे स्थापन करणे या बाबींचा अभ्यास करण्यांत सगळा वेळ खर्च केला पाहिजे. खालपासून वरपर्यंतच्या सर्व पायांवरील अधिकारी, त्यांचे