पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

का इष्ट सुधारणा ७३ योग्य काळजी घेतली तर दहा पंधरा वर्षात सर्व प्रजा साक्षर करता येईल, लिहिणे, वाचणे व जमाखर्च इतके शिक्षण सर्व माणसांना या दहा पंधरा वर्षात देतां येईल. सन १९१९ सालचा. कायदा जरी असमाधानकारक व अपुरा आहे तरी या असल्या मोडक्या कायद्याचा जर चांगल्या प्रकारे सरकाराने मनःपूर्वक उपयोग केला व लोकांच्या प्रतिनिधींनी पक्षभेद विसरून देशहिताच्या दृष्टीनेच त्याचा उपयोग करण्याचे ठरविले तर हिंदुस्थानांत पुष्कळ गोष्टी घडून येतील. पण इंग्रज अधिकाऱ्यांची अधिकारलालसा व घमेंडखोरपणा व हिंदुस्थानांतील लोकांची एकमेकांचा घात करण्याची प्रवृत्ति यामुळे या देशाच्या प्रगतीला आजपर्यंत अनेक विघ्नं आली आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी-हिंदी सरकारी अधिकाऱ्यांनी जर आपला अधिकार बरोबर कायद्याप्रमाणे चालविला तर देशाचे किती तरी कल्याण होईल. पण हल्ली अधिकारी आपल्या जुलमाने इंग्रज अधिकाऱ्यांच्यावर ताण करतांना नेहमी दिसतात. असा अतिक्रम करणे म्हणजे बढती मिळविण्याचे साधन व एकाची तात्कालिक बढती म्हणजे देशाचे चिरकालिक हित असे त्यांना वाटते. बढती कोणाला तरी मिळणारच व ती कोणालाहि मिळाली तरी ती हिंदुस्थानाचेंच हित करते. पण आपण गैर वागून आपलें, सरकारचे व देशाचे अहित करतों हे हे शहाणे ओळखीत नाहीत. . अशा त-हेनें हिंदुस्थानाच्या लोकांना आत्महित साधण्यास वाव ठेवण्यानेच विलायतची दुर्बलता आपल्या नजरेस येते. प्रत्येक खात्यांत इतक्या जागा हिंदी लोकांना देणे त्यांना भाग पडते यावरूनच हिंदी लोकांनी मनांत आणल्यास त्यास स्वराज्य मिळविणे शक्य व सुलभ आहे ही गोष्ट सिद्ध होते. एका जिल्ह्यांत फक्त दहा वीस गोरे अधिकारी असतात व हे लोक आपल्या सर्व लोकांच्या विरुद्ध किती जातील ? व काय करू शकतील ? पोलीस, लष्कर वगैरे सर्व खात्यांत हिंदी नोकर आहेत व त्यांच्या एकमुखी मागणीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना मान देणे भाग आहे. पण हिंदी लोक ही आपली शक्ति ओळखतील तेव्हांना ! सर्वजण जर रास्त रितीने वाणू लागले तर अन्यायाने बढती देणार कोणाला ? कोणालाहि बढती मिळाली तरी ती ताटांतच (हिंदुस्थानांतच ) मिळणार. याप्रमाणे प्रत्येक बाबीचा