पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ भावी हिंदी स्वराज्य [प्र.४ देशांची असती तर ती असाध्यच होती; पण हिंदुस्थानांत चिवटपणा किंवा स्थितिस्थापकता जास्त आहे व म्हणूनच हिंदुस्थानाला स्वराज्य प्राप्त होण्याची अद्याप आशा आहे. परिस्थितीत जरा पालट झाला की हिंदु. स्थानाची स्थिति सुधारेल. स्वराज्य मिळतांच देशांत पाऊसपाणी ठीक होऊन आबादानी होईल. लोक व्यवस्थित व अल्पसंतुष्ट असल्याने त्यांची सांपत्तिक स्थिति तेव्हांच सुधरेल, मोठे कारखाने निघाले नाहीत तरी देश आपल्या स्वतःच्या गरजा भागवून संपन्न होईल. लोकांच्या हाडीमासी खिळलेली ज्ञानसंपन्नता व वैराग्य ही हिंदुस्थानची मोठी भाग्यचिन्हे आहेत, व्याक्तिशः व एकंदर लोकसंख्येच्या मानाने लिहिणे वाचणे. जाणणाऱ्या लोकांची संख्या जरी कमी असली तरी त्यांचे तारतम्यज्ञान इतर कोणत्याहि देशापेक्षा जास्त आहे. एखादा अगदी अडाणी भिल्ल जितकी नीति, धर्म, वेदांत वगैरे जाणतो तितके उच्च ध्येयात्मक ज्ञान इतर देशांतील साधारण सुशिक्षित माणसाला देखील नसते. तात्पर्य, हिंदुस्थानांत ज्ञान थोडे असले तरी ते खोलपर्यंत रुजलेले आहे व त्यामुळे जरा चालन देतांच त्यांत लागेल तितकें पीक येईल. अगदी आधुनिक शिक्षणाचा विचार केला तरी आपणांस असे दिसेल की, यूरोपातील कोणत्याहि देशांतील मुलांच्या संख्येपेक्षां हिंदुस्थानांतील शिकणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. हिंदुस्थानांत आठच युनिव्हर्सिट्या असून त्यांच्या पदवीघराची संख्या विलायतेतील पंचवीस युनिव्हर्सिट्यांतील पदवीधरांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. याप्रमाणे खोली थोडी असली तरी विस्तार जास्त असल्यामुळे एकंदर ज्ञानाची बेरीज हिंदुस्थानांत जास्त आहे व या समष्टि ज्ञानाचा फायदा घेण्यास आपण झटले पाहिजे. हल्ली हे ज्ञान विखुरलेले आहे ते व्यवस्थित मांडून एकमुखी केल्यास पुष्कळ कार्य करता येईल. एकदंर हिंदी समाजाची नीट मांडणी केली, त्याच्या सामर्थ्याची एकमुखी व व्यवस्थित योजना केली व देशांतील शेती व उद्योगधंदे यांना चिकाटीने शास्त्रीय ज्ञान व यंत्रसामुग्री यांची जोड दिली तर हल्लीच्या स्थितीत सुद्धा दहा वर्षांत देशाचे उत्पन्न दुप्पट व पंधरा वर्षांत तिप्पट करता येईल. याच प्रमाणे योग्य जकाती ठेवल्या तर पंधरा वर्षांत परदेशी जाणाऱ्या पक्कया मालाचा व्यापारहि दुप्पट करता येईल. शिक्षणाबद्दल