पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

थे. इष्ट सुधारणा व अच्छादन या गोष्टी मुख्य पाहिजेत; त्यांपैकी अन्नासाठी पुरुषांनी आपला नेहमींचा धंदा करावा व आच्छादनासाठी त्यांनी रिकामपण व घरच्या इतर मंडळींनी आपली फुरसत वापरली पाहिजे. असे केले म्हणजे हिंदुस्थानाची बरीच ददात जाईल. मातमी शिवार हिंदुस्थानची सामाजिक व्यवस्था अशी आहे की, त्यामुळे प्रजोत्पादनाला अद्याप अडथळा आला नाही, इतकेच नव्हे तर केव्हां केव्हां जास्त प्रजोत्पादन होते असे म्हणावे लागते. लग्ने साधारणपणे लवकरच होतात व मुलाबाळांच्या पोटाची काय व्यवस्था वगैरे विचार न करतांच प्रजोत्पादन होते. यामुळे प्रजा जरा जास्त होते खरी, पण इतर देशांपेक्षा व्यभिचाराचे प्रमाण फार कमी आहे. पाश्चात्य देशांत जरी पंचवीस वर्षांचे सुमारेच लग्ने होतात तरी व्याभिचाराचे प्रमाण जास्त असून प्रजोत्पादन कमी आहे. त्या देशांत लग्ने करण्याची जी पद्धत आहे त्यामुळे स्त्रीपुरुषांचा फाजील संबंध येतो व या आतिरिक्त संबंधामुळे पुरुषांची प्रजोत्पादनशक्ति लवकरच नाहीशी होते. शिवाय प्रयत्नवादी समाजांत मुलाबाळांची काळजी करून मुले न होतील अशी योजना करण्याकडेहि प्रवृत्ति आहे. अर्धपोटी राहणाऱ्या, अर्धवट शिकलेल्या, अशक्त अशा कोट्यवधि माणसांपेक्षा पोटभर जेवणारी शानसंपन्न व धडधाकट थोडी माणसें बरी ही गोष्ट हिंदुस्थानाला आतां फिरून नव्याने शिकण्याचा प्रसंग आला आहे. हिंदुस्थानाची परिस्थिति इतक्या झपाट्याने बदलली आहे की, हा विचार सुचून त्याप्रमाणे आचरण करण्यास त्याला सवडच मिळाली नाही. हजारों वर्षांच्या संवयी एक शें पन्नास वर्षांत सुटल्या नाहीत तर काही आश्चर्य वाटावयाला नको. या बाजूकडे लोकांचे लक्ष हल्ली लागले आहे. पाश्चात्यांची लमपद्धति व स्त्रीपुरुषसंबंध एका अर्थाने वाईट आहेत ही जाणीव त्यांना झाली आहे. तरी ती पद्धति बदलणे जसे त्यांना अशक्य आहे त्याचप्रमाणे हिंदुस्थानच्या लोकांच्या कांहीं चालीरीती वाईट आहेत हे कळते तरी त्या सोडणे त्यांना कठीण झाले आहे. हळूहळू या गोष्टी सुधारतील असे दिसते. पण त्या पलीकडच्या काठाला जाऊ नयेत अशी खबरदारी घेतली पाहिजे. हिंदुस्थानाची हल्ली जी अव्यवस्था आहे तसली अव्यवस्था जर इतर