पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

9. भावी हिंदी स्वराज्य [प्र. घालणारे व या गोष्टी नसणारे, मांसाहारी व मांस न खाणारे, दारू पिणारे व न पिणारे, अशा सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश हिंदु धर्मात होऊ शकतो. प्रत्येकाचे स्वातंत्र्य राहण्यासाठी आचारभेद, पंथभेद, त्यांत आहेत. अमुकच ग्रंथ, अमुकच मत, अमुकच व्यक्ति प्रमुख किंवा सर्वज्ञ मानावी असा त्याचा आग्रह नाही किंवा सर्वज्ञ मानूं नये असेंहि तो धर्म म्हणत नाही. तात्पर्य, स्वतंत्रता व परमतसहिष्णुता हे दोन या धर्माचे अढळ खांब आहेत व यासाठी हा जगाचा धर्म होणे शक्य आहे व त्याप्रमाणे शक्य तर तो निदान सवे हिंदुस्थानाचा धर्म व्हावा. या कामात या श्रेष्ठ वरिष्ठ जातिभेदाप्रमाणेच हिंदुस्थानांत स्त्री व पुरुष हे भेदहि बलवत्तर आहेत. हिंदु स्त्रियांना शिक्षण कमी व घरकामाशिवाय दुसऱ्या कामांत त्यांचा हातहि कमी आहे. त्यांच्याबद्दल “सबंध साळ्याची.. अर्धी माळ्याची, मालकीण तेल्याची व ऋणकरीण ब्राम्हणाची" अशी म्हण प्रचारांत आहे. साळ्याची बायको नवऱ्याच्या बरोबरीने. काम करते, माळ्याची ( शेतकऱ्याची ) बायको त्याच्या निम्याने काम करते, तेल्याची बायको मेहनतीचे काम न करतां दुकानच्या मालकिणीचे काम करते (हीच स्थिति इतर धंद्याची साधारण आहे) व ब्राम्हणाची बायको नवऱ्याच्या सापेक्षतेने कांहींच (आर्थिक) काम करीत नाही. ब्राम्हणाची बायको द्वव्यसंपादनाचे काम करीत नसली तरी ती घरकामांत. इतरांपेक्षा जास्त सुगरण असते व ब्राम्हणाच्या घरी तितक्या उत्पन्नांत सुखसोई जास्त असतात हे विसरता येणार नाही. बायकांना हिंदुधर्मकारांनी स्वातंत्र्य फार कमी ठेवले आहे व अंतर्व्यवस्था मात्र त्यांजकडे ठेवली आहे ही गोष्ट खरी. पण यामुळे स्त्री व पुरुष यांत जी स्पर्धा पाश्चात्य देशांत दिसते ती उत्पन्न झाली नाही व समाज · हजारों वर्षे सुखाने नांदला हा फायदा कांहीं लहानसहान नाही. हिंदुस्थानांतील निम्मी लोकसंख्या याप्रमाणे धनोत्पादनाच्या कामांत मागे पडल्यामुळे त्या देशाच्या दरमाणशी उत्पन्नाची सरासरी फार कमी पडते व सगळ्यांना पोटभर अन्न मिळण्यास हल्ली अडचण पडते ही गोष्ट खरी. यासाठी या आपत्काळी आपण बायकापुरुषांनी आपला फुरसतीचा वेळ कापसाचे सूत काढून कापड विणण्यांत घालविणे जरूर झाले आहे. माणसाला अन्न