पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

थे. इष्ट सुधारणा पात्र व्हावे असे वाटत नाही. हेच लोक खिस्ती झाले म्हणजे जसे -स्वच्छ व आचारशीलपणे वागतात तसे हिंदु असतांना वागत नाहीत. हिंदुत्वाला अमान्य असे अभक्ष्यभक्षण आपण करू नये, आपल्या देशाला शोभेल अशी स्वच्छता आपण पाळावी ही गोष्ट यांना समजत देखील नाहीं. तात्पर्य, दोघांनाहि एकमेकांबद्दल प्रेम व कळकळ वाटत नाही. दोघेहि असलेल्या स्थितीविषयीं अगदी बेफिकीर व सुस्त आहेत. ही स्थिति अवश्य पालटली पाहिजे. ज्याने त्याने आपल्या जातिधर्माचा व्यवसाय करावा, समाजांत आपण आपल्या वाटणीचे काम पुरे पाडावें पण त्याशिवाय इतरत्र सर्वांनी एकमेकांस सारखेपणाने वागवावे. चांभा. राने आपला जोडे शिवण्याचा धंदा करून इतर राष्ट्रीय बाबींत इतरांबरोबरीने लक्ष घालण्यास हरकत नाही. ब्राम्हणाने आपले धार्मिक उपाध्येपणाचे काम करून सार्वजनिक बाबींत चांभाराची सल्ला घेण्यास व त्यास त्याचे कर्तव्य समजावून देण्यास तयार असले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या धंद्याचे आपले विशिष्टत्व ठेवणारे गुप्त रहस्य आपल्यापाशी ठेवून सर्वसामान्य व्यवहार शिकला व शिकविला पाहिजे हे यांना समजत नाही. पूर्वीची परि. स्थिति हल्ली बदललेली आहे, हे ओळखून सर्वांनी एकमेकांस मदत केली पाहिजे. पूर्वीच्या शास्त्रांत वरिष्ठ जातींनी सर्वत्र तूर वापरावे असे सांगितले असून गरीबीमुळे ज्याप्रमाणे आपण तेल वापरतो, त्याचप्रमाणे पूर्वीच्या शास्त्रांत चांभार महार आपले शत्रु म्हणून त्यांस शिवू नये असे सांगितले असले तरी ते पूर्वीचे शत्रुत्व बदललेल्या परिस्थितीत राहिले नाही म्हणून त्यांना न शिवण्याचे तत्व सोडले पाहिजे, जगांत नेहमी जो आपला शत्रु, घातक, द्वेषी असेल तो अस्पृश्य असावा हे ठीकच आहे. त्याप्रमाणे हल्लींच्या काळी काळे गोरे किंवा रंगित व बिनरंगीहे एकमेकांस अस्पृश्य आहेतच; मग आणखी त्या अस्पृश्य लोकांत आपल्याच काही लोकांची निरर्थक भर घालणे अनवश्यक होय. शक्य तर हिंदु व मुसलमान यांचे सुद्धां द्वैत नाहीसे व्हावे, सुनी पंथाच्या या दोन्ही शाखा आहेत असे समजावे. हिंदी म्हणून नवीनच धर्माच्या या व हिंदुस्थानांतील सर्व धर्मशाखा आहेत असेंहि समजावें. हिंदु धर्म इतका व्यापक आहे की, त्यांत सर्व धर्माचा समावेश होणे शक्य आहे. मूर्तिपूजक, मूर्तिपूजा न करणारे, शेंडी व जानवें