पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०४ स्थापित करण्यासाठी केलेले अर्धवट लष्करी) कायदे नव्याने अमलांत आणण्यांत आले आहेत. कायद्यांत असलेल्या कलमांचा ओढून ताणून शांतता स्थापित करता येईल असा अर्थ लावण्यांत येतो. इतकी सामुग्री पुरतः नाही म्हणून नवीन मुद्रण, भाषण व पर्यटनस्वातंत्र्यावर घाला घालणारे कायदे करण्यांत येत आहेत. अशा त-हेचा कारभार कोणत्याहि सुधारलेलें म्हणनः मानलेल्या राज्यांत पहावयाला सांपडणार नाही. तात्पर्य, प्रत्यक्ष इंग्रजी राज्य जरी सधारलेले असले तरी त्याचा हिंदुस्थानांतील कारभार त्या सुधारलेल्या पद्धतीने किंवा सुधारलेल्या नमुन्याप्रमाणे चालत नाही. हिंदी ले कहि स्वतः परप्रत्ययनेन (होयबा) व अप्रतिकारी (मुकाट्याने सोसणारे ) आहेत. त्यांची दृष्टी आपली जात, आपला पथ, आपला व्यवसाय यापलीकडे जास्त विस्तृत असा राष्ट्रीय व्यवहार पहाण्यास असमर्थ आहे. राष्ट्रीय भावना, राष्ट्रीय आचार, राष्ट्रीय विचार त्यांच्यांत दृष्टोत्पत्तीस येत नाहीत. हल्ली जगांत काय चालले आहे हे न पाहतां ते दोन हजार वर्षांपूर्वीच्या गोष्टींत गुंग झालेले आहेत. "नवेन अनवं शोधयेत्” नव्या दृष्टीने जुन्याकडे पहावे, किंवा जुन्यांत नवें मिसळून बदलेल्या काळाशी समपद किंवा योग्य असावे हे कौटल्याचे सूत्र त्यांना समजत नाही. ते अज्ञानी असल्यामुळे एक तर अगदी जुन्याला चिकटतात अगर अगदी नव्याशी तद्रूप होतात. साधारण मध्यम अवस्थेत त्यांना रहातांच येत नाही. परदेशी प्रवास करणे त्यांना जिवावर येते. नेहमी दुसऱ्यावर भार टाकून बसण्याची सवय झाल्यामुळे पुष्कळ लोक निव्वळ बांडगुळे किंवा पोशे झाले आहेत. आपण स्वतः कांहीं करूं असे तर त्यांना वाटत नाहींच; पण आपणाला कांहीं तरी करता येईल इतका आत्मविश्वास देखील त्यांना उरलेला नाही. फार झाले तर पूर्वजांची कीर्ति गावी व स्वस्थ उपाशी मरावे इतकेच त्यांना समजते. हिंदुस्थान देशांत एकमेकांना न शिवणारे असे कोट्यावधि लोक आहेत. आपणांस श्रेष्ठ समजणाऱ्या लोकांना आपण या लोकांना, आपल्या भावांना, खुशाल घाणीत लोळू देतो हे बरोबर नाही; ही आपली लहान भावंडे, यांना उठवून धुऊन पुसून आपल्या बरोबरीस आपण आणले पाहिजे अशी जाणीव नाही. कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या लोकांनाहि, आपण उठन आपले आचरण वगैरे सुधारून, या आपल्या थोरल्या भावांच्या आदराला :