पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। इष्ट सुधारणा हिंदुस्थानांतील लोकांच्या या कमी उत्पन्नाचे कारण हिंदुस्थानांतील लोक ज्यांत उत्पन्न किंवा नफा कमी अशा धंद्यांत गुंतलेले आहेत हे होय. धंद्यांतल्या धंद्यांत सुद्धां जास्त उत्पन्नाचे धंदे परकीय लोकांच्या ताब्यांत आहेत. भारी पगाराची नोकरी परकीय लोकांची, भारी नफ्याचे व्यापार परकीयांचे, भारी फायद्याचे कारखाने परकीयांचे, भारी उत्पन्नाच्या खाणी परकीयांच्या, भारी किंमतीचे जिन्नस परकी लोक पिकवितात. याप्रमाणे सर्व जास्त संपत्ति परकी लोकांच्या पदरांत पडते. स्वदेशांतच हिंदी लोकांची ही कुचंबणा; मग परदेशांत किफायतशीर धंदे हिंदी लोकांना करूं देत नाहीत किंवा करण्यास वाव मिळत नाही हे सांगावयालाच नको. परकी लोक तरी हिंदी लोकांना अशी सवड कशाला देतील १ जेथे प्रत्यक्ष इंग्रज लोकच तसे करूं देत नाहीत हे त्यांना दिसते, तेथे त्यांना तरी काय म्हणणार ? इंग्रज लोकांना आपल्याच करणीमुळे “या हिंदी लोकांना असे करू द्या किंवा कां करूं देत नाही" असे म्हणतां येत नाही. फार काय? पण एखाद्या हिंदी गृहस्थाला एखाद्या पाश्चात्य संस्थेचे सभासद व्हावयाचे असले तर ती संस्था हिंदुस्थानांत त्या गृहस्थाला इंग्रज तज्ञ आपला बरोबरीचा समजतात कां असा प्रश्न करून मग त्यास सभासद होऊ देते. नुसत्या नांवासाठी योग्य माणसाला सभासदत्व मिळाले नाही, पदवीच्या केवळ अक्षरांत बदल असल्यामुळे हिंदी पदवीधर कमी लेखला गेला अशी उदाहरणे आहेत. तात्पर्य; इंग्रज लोकांचे पक्षपाती वर्तन हिंदी लोकांना जिकडे तिकडे नडते व त्यांचा सर्वत्र पाणउतारा करते. यात हिंदुस्थानांतील राज्यपद्धतीचे धोरण, देशाचा उत्कर्ष करण्यापेक्षा, देशांत शांतता राखण्याकडे जास्त आहे. ज्याप्रमाणे एखादा आडमुठ्या पंतोजी शाळेत मुले काय शिकतात हे न पाहतां तो मुले नुसती गप्प बसतात, गोंगाट वगैरे करीत नाहीत इतकेच पहातो, त्याचप्रमाणे इंग्रज सरकार फक्त दंगेधोपे होत नाहीत असे पहाणे इतकेच आपले काम असे समजते. ही शांतता सुद्धां निव्वळ दंडुक्यांनी व पोलीसांच्या मदतीने ठेवण्यांत येते. अशा रीतीने लोकांची कर्तबगारी नाहीशी होते व त्यांची वाढ खुंटते या गोष्टीकडे डोळेझांक करण्यांत येते. अगदी अलीकडच्या काळांत सुद्धां जुने दडपशाहीचे (इंग्रजी राज्य नवीन स्थापित झाले तेव्हां शांतता