पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मावी हिंदी स्वराज्य लोकांनी हिंदी व्यापाऱ्यांना सम्यपणे वागविले पाहिजे असा आग्रह, हिंदुस्थानांतून बाहेर माल पाठवील त्याला बक्षीस अशा प्रकारची कोणतीहि सवलत, हिंदी सरकार आपल्या हिंदी प्रजाजनांना देत नाही. परदेशची रड बाजूला ठेवली तरी प्रत्यक्ष ब्रिटीश साम्राज्यांत हिंदी व्यापाराला योग्य मदत तर नाहीच पण निःपक्षापात रीतीने वागविण्यांत देखील येत नाही. कित्येक वेळां तर चिनी किंवा जपानी व्यापारी व कारागीर यांना ब्रिटिश साम्राज्यांत जसें वागवितात तितके सौजन्य सुद्धां हिंदी लोकांना वागविण्यांत दाखविण्यात येत नाही व याबद्दल हिंदुस्थान सरकारला रागहि येत नाही. तात्पर्य, हिंदुस्थानांत, हिंदुस्थानाबाहेर ब्रिटिश साम्राज्यांत अगर परदेशांत हिंदी लोकांच्या उद्योगीपणाला व बुद्धिवैभवाला उत्तेजन येईल, निदान त्यांची योग्य चहा होईल इतकी सुद्धांव्यवस्था हिंदुस्थान सरकार करीत नाही. विलायत सरकारच्या, विलायतच्या लोकांच्या स्वार्थासाठी असे करण्यांत आले तर ते कदाचित क्षम्य समजण्यांत येईल. पण जेथे विलायत सरकारचा स्वार्थ नाहीं तेथें म्हणजे ब्रिटनखेरीज ब्रिटिश साम्राज्यांत व इतर परदेशांत तरी हिंदी व्यापार, हिंदी उद्योगधंदे, हिंदी उद्योगी व पराक्रमी माणसे यांची जोपासना होऊन त्यांस उत्तेजन येईल असे धोरण सुद्धां विलायत सरकार ठेवीत नाहीं; इतकी त्या सरकारची हिंदुस्थानांतील गोष्टींबद्दल आस्था आहे. ही स्थिति महायुद्धानंतर बदलेल असे वाटले होते. पण दोस्तांचा जय झाल्याने असा बदल होण्याची जरूरी उरली नाही असे दाखविणारे वर्तन आज ब्रिटिश मुत्सद्दी करीत आहेत. . या सर्व अनास्थेचा परिणाम हिंदुस्थानावर फार वाईट झाला आहे, कानडा किंवा संयुक्त संस्थाने या देशांतील एक साधा कौशल्य नसलेला मजूर एका आठवड्यांत जे द्रव्य मिळवितो तितकें द्रव्य मिळविण्यास हिंदी मजुराला एक वर्षहि पुरत नाही. हिंदुस्थानांतील सगळ्या लोकसंख्येचे एकंदर वार्षिक उत्पन्न विलायतेंतील तितक्याच लोकांच्या उत्पन्नाचा विसावा हिस्सा आहे व अमेरिकेतील संयुक्त संस्थानांतील तितक्याच लोकसंख्येचे उत्पन्न हिंदी लोकांच्या उत्पन्नाच्या तीसपट आहे; असे असून सुद्धा इतक्या उत्पन्नांत या तेहतीस कोटी लोकांना आपला निर्वाह करून त्यांतच सगळ्या जगांत भारी पगाराची एक नोकरशाही पोसावी लागते.