पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

थे. - इष्ट सुधारणा करणारा इसम इंग्रज अधिकाऱ्यांच्या रोषाला पात्र झाल्यावांचन रहात नाही. आजपर्यंत इंग्रज अधिकाऱ्यांनी ज्या चुका केल्या त्यांची परंपरा व कड फळें प्रत्येक व्यवस्थित काम करणाऱ्या माणसाला पावलोपावली जाणवतात व तो त्याबद्दल त्यांना दोष देण्यास उद्युक्त' होतो. आपल्यास दोष देणारा, आपणांस नांवे ठेवणारा इसम कोणाच्याहि रोषास पात्र होणे साहजिक आहे. व्यवस्थितपणे काम करणारा माणूस ' असे दोष दाखवू लागला व रोषास पात्र झाला म्हणजे त्याच्या व्यवस्थितपणामुळे न्यायाने त्याला काही शिक्षा वगैरे करता येत नाही व मग त्याचे तोंड बंद करणे व आपली जनतेत होणारी अपकीर्ति थांबविणे या कामासाठी अधिकाऱ्यांना अन्यायाची कास धरणे भाग पडते. याप्रमाणे चकीच्या रस्त्याला लागलेला मनुष्य काय करील व काय करणार नाही याचा नियमच राहत नाही. अशा त-हेनें हिंदुस्थानांतील सन्माननीय माणसे व त्यांचे उद्योग गुन्हेगार ठरून त्यांना कशी शिक्षा भोगावी लागते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिंदी कापडावर बसविलेली जकात होय. हिंदुस्थानांतील गिरण्यांत व हातमाग वगैरेवर उत्पन्न होणारे कापड हे उद्योगी व व्यवहारदक्ष माणसाचे काम आहे व या कामासाठी जकातरूपी दंड त्यांना निरर्थक भरावा लागतो. याशिवाय खादी वापरणारा, देशी पोषाकाची पद्धत कायम ठेवणारा इसम पाहतांच कित्येकांना राग येतो तो निराळाच. ब्रिटिश साम्राज्यांतील कानडा देश विलायती कापडावर पंधरा टक्के जकात घेतो व शेजारच्या संयुक्त संस्थानांतील कापडावर तर बावीस ते पंचवीस टक्के जकात घेतो व याप्रमाणे आपल्या देशाच्या कारागिरांचे व उद्योगी माणसांचे संरक्षण करतो. जगांत हल्ली असा कोणताच देश हयात नाही की, जो आपल्याच देशाच्या कारागिरीवर जकात बसवून कारागीर व उद्योगी माणसांना दंड करतो. पण ही गोष्ट हिंदुस्थानांत आहे ! हिंदुस्थानांत परदेशी मालाला पूर्ण मुक्तद्वार असून देशांत उत्पन्न होणान्या मालावर मात्र जकात वगैरेची धोंड पडते. परदेशांत हिंदुस्थानां. तील व्यापारी व्यापारासाठी गेले तर त्यांना सरकारकडून कोणतीहि आर्थिक, किंवा राजकीय सवलतीची मदत करण्यांत येत नाही. पेठ्यांनी परदेशी पेढ्या स्थापण्यास मदत, व्यापाऱ्यांना भांडवलाची सवलत, परदेशच्या भा...हिं...स्व...५