पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०४ हिंदुस्थान देशांतील उत्पन्नाच्या बाबींची योग्य वाढ झाली नाही याचे कारण हिंदी लोकांना ती वाढ करण्याचे शिक्षण व वावहि मिळाली नाही, व इंग्रज लोकांना त्या वाढीची अवश्यकता लागली नाही. आता इंग्रज लोकांचे लक्ष या वाढीकडे लागत आहे व ही वाढ झाली पाहिजे. ही गोष्ट त्यांना पटू लागली आहे. जर इंग्रजी राज्य हिंदुस्थानांत होतांच हिंदी लोकाना जरूर तें यांत्रिक शिक्षण व नवीन उत्पन्नाच्या वाढीला. लागणाऱ्या सवडी दिल्या गेल्या असत्या तर त्याच्या प्राचीन परंपरागत हस्तकौशल्यामुळे जगांतील कोणत्याीह देशांतील मालाला मागे टाकतील अशाजिनसा त्यांनी निर्माण केल्या असत्या, व हल्लींच्या काळी हिंदुस्थान हैं अद्भुत सामर्थ्यसंपन्न राष्ट्र झाले असते. आतां अशी स्थिति आहे की, धंदे व व्यापार यांमध्ये मोठे भांडवल व अफाट कारखाने यावांचून इतर देशांच्या चढाओढीत हिंदुस्थानाचा निभाव लागणार नाही. विलायतेत अशा कारखान्यांना सरकार उत्तेजन व मदत देते. पण हिंदुस्थानांत अशा कारखान्यांना इंग्रजी व्यापाराचे भयंकर प्रतिस्पर्धी समजण्यांत येते. इतकेंच नव्हे तर इंग्रजांच्या व्यापाराचा शत्रु तो इंग्रजांच्या सामर्थ्याचा व सत्तेचा शत्रु समजण्यांत येते. सन १९०६ च्या स्वदेशी चळवळीच्या वेळी रिव्ह्यू ऑफ रिव्ह्यूजच्या संपादकांनी "हिंदुस्थानची स्वदेशी चळवळ म्हणजे इंग्लंडने जगावें कां हिंदुस्थानने जगावे असा प्रश्न आहे व या प्रश्नाचे विलायतसरकारने काय उत्तर द्यावे हे मी सांगायला नकोच" असे प्रतिपादन केले होते. गेल्या महायुद्धाच्या वेळी मात्र जर आज हिंदुस्थानदेश संपन्न व समर्थ असता तर त्याने आपल्यास फार मोठी मदत केली असती व मग अमेरिकेसारख्या प्रतिस्पर्धी राष्ट्राची मदत हात जोडून मागण्याचा प्रसंग आसा नसता असे इंग्रज मुत्सद्याना वाटले. अजूनहि याबाबद इंग्रजी मुत्सदी योग्य दृष्टीने विचार करतील तर हिंदुस्थानची भरभराट व समर्थपणा म्हणजे ब्रिटिश साम्राज्याची भरभराट ही गोष्ट त्यांच्या लक्षांत नीट ठसेल. झालेल्या चुकीची मनोभावाने दुरुस्ती करण्यांत आली तर ब्रिटिश साम्राज्य जगांत अजिंक्य होईल हे कोणीहि सांगं शकेल. उद्योगी असणे हा एक हिंदुस्थानांत गुन्हा समजला जातो असे म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाही. कोणतेहि काम शिस्तीने व व्यवस्थितपणाने