पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

_भावी हिंदी स्वराज्य [प्र०४ गिरी हिंदुस्थानांत थोडीच आहे. परंतु हिंदुस्थानाला या युद्धामुळे मोठे कर्ज झाले असून महागाई व धान्याचा दुष्काळ या गोष्टींचा विचार हिंदुस्थानांत फार कळकळीने करण्याची अत्यंत अवश्यकता उत्पन्न झाली आहे व या बाबींत काय करावे याचा विचार इंग्रज सरकार करीत आहे. हिंदुस्थानांतील सार्वजनिक पुढाऱ्यांना, जनतेच्या पुढाऱ्यांना, महिंदुस्थानांतील राज्यव्यस्थेची मांडणी सुखकारक होईल अशा बेताने कशी सुधारावी याच एका बाबीची मोठी विवंचना लागली आहे. असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे गेली शंभर दीडशे वर्षे या देशांत राजकीय, सामाजिक व आर्थिक या बाबींचा मोकळ्या मनाने व योग्य रीतीने विचार सुद्धा करण्यांत आलेला नाही. अशी हे सांड इतका काळपर्यंत झाल्यामुळे हा रोग इतका बलवान् झाला आहे की, तो असाध्य होऊन राष्ट्र क्षयरोगी होण्याची चिन्हें स्पष्ट दिसू लागली आहेत. जपान देशाने या कामाला . केवळ पन्नास वर्षांपूर्वी सुरुव त केली व हे काम अद्याप खुप जोराने चालविलें आहे. व त्यामुळे आज जपान हे राष्ट्र जगांतील प्रमुख व बलाढ्य राष्ट्रांत गणले जाते. हिंदुस्थान परतंत्र झाल्यामुळे गेल्या दीडशे वर्षांत हिंदुस्थानांत योग्य सुधारणा झाली नाही. यासाठी जपानने केलेल्या कामाला हिंदुस्थानाला आज सुरुवात करावी लागत आहे. पुष्कळ वर्षे दुरुस्ती न केल्यामुळे अस्ताव्यस्त झालेली इमारत हिंदुस्थानाला आज नवीन बांधण्याचे काम हाती ध्यावयाचे आहे. - या दुरुस्तीच्या अगर नवीन रचनेच्या कामांत पहिल्याने शिक्षणाची सुधारणा हाती घेतली पाहिजे. शिक्षणाने नव्या उत्पन्न होणाऱ्या नागरिकांना योग्य वळण लागते व पायांत याप्रमाणे दुरुस्ती झाली म्हणजे वरचा भाग आपोआप ठीक होतो, झाडाच्या मुळांतून नवीन व अधिक पौष्टिक रस पुरेसा मिळू लागला म्हणजे वरची पाने, फुले, फळे वगैरे आपोआप सुधारतात. आज हिंदुस्थानांत अशी स्थिति आहे की, दर चार गांवांपैकी तीन गांवांत मुळी शाळाच नाहीत, आणि सर्व देशांत मिळून सुमारे तीन कोटी मुले मुळीच शाळेत जात नाहीत. शिक्षण सक्तीचे करण्याबद्दल सरकारी अधिकारी इतके बेफेकीर होते की जर एकादी म्युनिसिपालिटीसारखी संस्था ते फुकट देण्यास तयार झाली तर तिला तसे करण्यास परवानगी