पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मा इष्ट सुधारणा . im. - एखाद्या इसमाची प्रकृति बिघडली असली म्हणजे वैद्य त्याला पहिल्याने रेचक देतात. त्याचप्रमाणे एखाद्या संस्कृतीत अव्यवस्था झाली म्हणजे परमेश्वर त्या ठिकाणी लढाई सुरू करीत असतो. गेल्या महायुद्धाने हे काम केल्याचे चांगले निदर्शनास येते. या युद्धामुळे प्रत्येक समाजाला आपल्या अंगी असलेल्या दोषांची चांगली जाणीव झाली असून सर्व देशांनी या दोषांचे निरसन करण्याचे प्रयत्न जोराने चालविले आहेत. या प्रयत्नांत युद्धाने झालेली नासाडी भरून काढणे व युद्धासाठी गोळा केलेली साधने शांततेचा उत्कर्ष करण्याकडे वापरणे ही कामे प्रमुख आहेत. याच्या खालोखाल. अशा प्रसंगासाठी आत्मसंरक्षणाची साधने तयार ठेवणे हे काम महत्त्वाचे समजण्यांत येते. देशांत उत्पन्न होणाऱ्या जिनसांची निपज वाढविणे, आपणांस लागणाऱ्या सर्व जिनसा आपल्या देशांत उत्पन्न करणे, ज्या जिनसा आपल्या देशांत होत नाहीत अगर होणे शक्य नाही त्यावांचून निर्वाह करणे अगर त्यांचे ऐवजी दुसरी कोणती वस्तु वापरता येईल याची चौकशी करणे, आपल्या देशांतील माल बाहेर देशी आपल्या गलबते वगैरेतून पाठविणे व बाहेर देशांचा माल आपल्या देशांत, आपल्याच गलबते वगैरेंत आणणे, देशांत व्यावहारिक व धनोत्पादक धंद्याचे शिक्षण वाढविणे व या धंद्यांचा प्रसार करणे, देशांतील जनतेत एकोपा करणे व देशांतील मजूरवर्गाची स्थिति सुधारणे ही कामें या. प्रयत्नांत अनुक्रमाने हाती घेण्यांत येत आहेत. या कामांत हल्ली जगांतील सर्व राष्ट्रे अगदी गढून गेली आहेत. हिंदुस्थानाला सुदैवेंकरून या युद्धामुळे झालेली नुकसानी भरून काढण्याचे काम करण्याचे प्रयोजन नाही.. हिंदुस्थानाचे या युद्धांत आज भरून न निघण्यासारखें नुकसान झालेले नाही.. सैन्य वगैरे लढाऊ साधनांची शांततेच्या कामांत उपयोग करण्याची काम