पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र. ४ प्रतिपादन करीत असतात, पण ती गोष्ट आपणांस खोटी करून दाखवितां येईल असे आमचे मत आहे. दयाघन परमेश्वर या देशाला या कार्यात यश देण्यास कंबर बांधून उभा आहे व त्याच्या प्रेरणेनेच ही इच्छा आपणास होते असे आपण सर्वजण मनांत आणूं, आपापल्या परीने झटूं, एकमेकांचे पाय मागे ओढणार नाही तर इतर देशांच्यापेक्षां सुद्धां पुष्कळ चांगले राज्ययंत्र उत्पन्न करून सुख व संपन्नता संपादन करून दाखवू. राम व रावण यांमधील संबंध आपणास या कामी फार प्रोत्साहन देणारा आहे. रामाच्या वेळच्या वानरसेनेपेक्षा आपण काही जास्त हीन स्थितीला पोचलेले नाही, व म्हणून श्रीरामकृपेने त्यावेळी आपणांस जे करून दाखवितां आले तेच आज देखील करून दाखविता येईल. आपल्या पुढाऱ्यांनी मारुतिरायाचे उदाहरण ठेवून आपले सर्व सामर्थ्य बिनमोबदला व बिनशर्त या कामी वाहिले पाहिजे. ईश्वर असे करण्यास त्यांस बुद्धि देवो अशी प्रार्थना करून हे प्रकरण संपवितो.