पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रारंभीचा खटाटोप वेळोवेळी परीक्षा होऊन जनतेत त्याबद्दल उत्साह उत्पन्न होणार अगर वाढणार आहे. संघानें काम करण्याची हातोटी ही मोठी शक्ति आहे. कोणालाहि ही शक्ति अंगी बाणवितां येते व ही शक्ति किती आली हे अशा रीतीने अजमावून पहाता येते. अशा प्रकारे एक काम तडीस गेले तर लोकांची तसली कामे करण्याची शक्ति दसपट वाढते. ___ या ठिकाणी हे व त्या ठिकाणी ते काम करण्यासाठी चार मंडळी झटत असली म्हणजे झाले नाही. सर्व बाजूंनी सर्व लोकांनी आपआपल्या परीने स्वराज्यासाठी उठावणी केली पाहिजे. मूर्ति तितक्या प्रकृति या न्यायाने प्रत्येक मनुष्य आपल्या शक्तीप्रमाणे मार्ग काढील; व तो त्यास मोकळेपणे वापरू द्यावा. जर प्रत्येक व्यक्तीने या कामी आपला अल्प पैसा, अल्प वेळ, अल्प सामर्थ्य आपल्या परीने पण या एका कामाकडे लावले, निश्चयपूर्वक व कळकळीने लावले, तर अशा सर्वांची बेरीज किती तरी मोठी होईल. आपल्या सामर्थ्याप्रमाणे लहान मोठा एक एक दगड श्रीरामचंद्राच्या अठरा पद्म वानरांनी टाकतांच समुद्र भरून निघून सेतु झाला. सेतूंत प्रत्येक दगडाची जरूर होती. नुसत्या लहान दगडांनी किंवा नुसत्या मोठ्या शिलांनी हे काम झाले नसते. अत्यंत मऊ वस्त्रगाळ चुन्याच्या कणापासून तो डोंगराएवढाल्या शिळांपर्यंत सर्व दगडांची मिळून ही प्रचंड रचना झालेली होती. सर्व राष्ट्र कार्याची स्थिति याचप्रमाणे असते व असे झाले तर कितीहि मोठा पराक्रमी रावण मारला गेल्यावांचून रहाणार नाही. . ज्या ज्या हिंदी माणसाने वर लिहिलेल्या गोष्टींचा नीट विचार केला असेल व ज्याला ज्याला त्या गोष्टी नीट समजल्या असतील त्याला आपल्या हिंदुस्थानची हीन स्थिति पाहून लाज वाटेल व त्याची उन्नति करण्याची उमेद येईल. प्रत्येक हिंदी माणसाला ही लाज व ही उमेद वाटेल असे मात्र आपण केले पाहिजे. या कामाला लागणारौं वर्ष दोन वर्षे आपण जाणते लोक झटलों तर स्वराज्य ही गोष्ट सुखाने साध्य होईल असे वाटते. कामांत अडचणी आहेत, मोठ्या अजस्त्र अडचणी आहेत. पण त्या दुस्तर नाहीत. ह्या अडचणी आपण जुटीने सहज पार पडूं. कित्येक पाश्चात्य लोक " हिंदुस्थान लवकरच नामशेष होण्याच्या पंथांत आहे " असेंस