पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० ३. उत्पन्न केले पाहिजेत, लोकांत संपन्नता व स्वसंरक्षण करण्याची धमक आणली पाहिजे, याबाबद पाश्चात्य देशांनी स्वीकारलेले काही उपाय आपण अंगीकारण्यालायक आहेत. उदाहरणार्थ, एका म्युनिसिपालिटीने खालील जाहिरनामा लावला होता, "या ठिकाणी परंपरेचे दास्य नसून प्रत्येक वस्तूची किंमत गुणांवरून करावयाची आहे. जे करावयाचे त्या प्रत्येकाला एकच कसोटी लावावयाची की "अशाने आयुष्याच्या सुखांत भर पडेल काय ?" व या कसास उतरलेल्या सर्वांचा अगीकार करावयाचा." दुसऱ्या एका शहराने नागरिकांना हा उपदेश प्रसिद्ध केला होता; "आपण स्वस्थ बसलों तरी लोक आपल्यासाठी कामें करतील अशी जर तुमची समजूत असेल तर ती साफ चुकीची आहे. हे काम प्रत्येकानें केल्याशिवाय केव्हांहि होणार नाही." तिसऱ्या शहराने चोहोकडे हा जाहिरनामा वांटला. "शहरे वाढत नसतात. ती रचावी लागतात" प्रत्येक घरांतील प्रत्येक माणसाला हे तत्व पढविले पाहिजे की आपले काम आपण विचार करून आपणच केले पाहिजे, दुसऱ्यावर याबाबद टेकता कामा नये ! व्यक्तीचे हित स्वतःच्या मेहनतीने व समाजाचे हित सगळ्यांच्या एकवटलेल्या जोराने होत असते, आपल्या स्वाभाविक शक्तीचा उपयोग न केल्याने त्या शक्ती नाहीशा होत असतात. ___ कोणत्याहि प्रदेशांत जेव्हा जेव्हां कोणतेंहि मोठे काम करण्याचा प्रश्न उत्पन्न होईल तेव्हां स्थानिक संघाने त्या कामाचा विचार करण्यासाठी अत्युत्तम माणसे गुंतविली पाहिजेत. त्यांनी पूर्ण विचार करून एकमताने निर्णय केले पाहिजेत व त्या निर्णयांप्रमाणे सर्व लोकांनी मुकाट्याने आचरण केले पाहिजे. असे प्रश्न म्हणजे एखाद्या जिनसेची पैदास वाढविणे, एकादा नवा प्रचार पाडणे, एकादा कलंक धुवून काढणे, एकादी संस्था स्थापन करणे किंवा एकाद्या सार्वजनिक कामासाठी वर्गणी गोळा करणे असेल, पण असले कोणतेंहि काम आपण किती आस्थेनें, किती झपाट्याने व किती टापटिपीने उरकतों यावरून आपल्यांत स्वराज्यप्राप्तीची किती योग्यता आली आहे हे स्पष्ट समजणार आहे. याप्रमाणे आपल्या तयारीची