पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रारंभीचा खटाटोप ५७ मागील भागांत सांगितल्याप्रमाणे सर्व देशभर संघांचे जाळे पसरून - जुटीने काम करण्याची संवय. लागल्यावर जी काही सरकारकडून मदत । मिळेल ती सावधगिरीने स्वीकारण्यांत लोकांनी कसूर मुळीच करूं नये. ज्या ज्या बाबींत सरकारचा व जनतेचा मतभेद होईल अगर इंग्रज मुत्सद्यांचा त्याला विरोध दिसेल तेथे आपल्या स्वतःच्या हिंमतीवर कामें करण्याची त्यांची तयारी पाहिजे व या कामी चिकाटीने व स्वार्थत्यागपूर्वक त्यांच्या पुढाऱ्यांनी कामें शेवटापर्यंत पोचविली पाहिजेत. या सर्व कामांचा मुख्य भाग म्हणजे संघस्थापना व संघाने कामें करण्याचे अंगवळणी पाडणे हे होय. संघांशिवाय कोणतेंहि मोठे काम हाती घेता येणार नाही व जरी कदाचित् एखादें काम एकट्यादुकट्या माणसास हाती घेतां आलें तरी संघाचे शिक्षण त्याने जनतेस मिळणार नाही. यासाठी महत्त्वाचा असा प्रश्न - हाच आपल्या पुढे दत्त म्हणून उभा रहातो की, वर सांगितल्याप्रमाणे - संघ स्थापन करून एकजुटीने व मोठ्या नेटाने काम करण्यापुरती शक्ति हिंदुस्थानांत आहे का ? असे करण्याला लागणार धीर व नेट हिंदी जनतेत उरला आहे का ? ही अगदी साधी पण अत्यंत अवश्य गोष्ट हिंदी जनतेच्या हातून पार पडेल कां ? जर हे काम हिंदी लोकांना साध्य करून दाखवितां आले तर त्यांचा मोठा जयजयकार होणार आहे यांत संशय नाही. मग हिंदुस्थान हे जगांत एक अद्वितीय राष्ट्र आहे असे सिद्ध होईल. या मोठ्या कीर्तीसाठी हिंदी लोकांनी सर्वव्यापी पण साधे संघ स्थापन करण्यास सुरुवात करून चिकाटीने व धीराने कामास लागले पाहिजे. या कामांत अडचणी मोठ्या आहेत पण मिळणारें बक्षीसहि तितकेच मोठे आहे. महत्कीर्ति - महत्कृत्य केल्याशिवाय मिळत नसते. समर्थ म्हणतात तें अक्षरशः खरे आहे की, सुख पहातां कीर्ति नाहीं । कीर्ति पहातां सुख नाहीं॥ केल्यावीण काही नाहीं । केव्हां ही ॥१॥ मरावे परी कीर्तिरूपे उरावें। हे ध्येय प्रत्येक हिंदवासीयाने डोळ्यांपुढे ठेऊन काम केले पाहिजे. या कामासाठी फार जोराची चळवळ केली पाहिजे, लोकांचा आळस - व दुराग्रह पार मोडून काढले पाहिजेत, त्या जागी योग्य आकांक्षा व उत्साह