पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० ३ या गोष्टींसंबंधाने हिंदी लोकांचे लक्ष विशेषतः खालील गोष्टीकडे लागले पाहिजे, *(१) राजकीय बाबींत हिंदुस्थानची स्थिति जी केवळ ताबेदारीची आहे ती बदलून त्या ठिकाणी मालकी अधिकार चालवितां आला पाहिजे. इंग्लंडमधून चांगले वाईट जे हुकूम सुटतील ते मुकाट्याने पाळण्याचे ऐवजी योग्य तथे ते धाब्यावर बसविण्याचीहि सत्ता हिंदी लोकांना पाहिजे, (२) आर्थिक बाबींत व्यापाराचा सर्व प्रकारचा व्याप हिंदी लोकांच्या हाती पाहिजे, तो तसा येण्यासाठी त्यांनी लागेल ते भांडवल गोळा केले पाहिजे, लागेल तें शिक्षण संपादन केले पाहिजे, लागतील ती सर्व साधने मिळविली पाहिजेत. तात्पर्य कोणत्याहि बाबींत या कामी हिंदी जनतेला परक्यांच्या तोंडाकडे पहावें लागतां नये. (३) सामाजिक बाबींत सर्व लोकांचा सारखा दर्जा असून त्यांत मोकळा व्यवहार व्हावयाला पाहिजे, इतर देशांत इतर स्वतंत्र राष्ट्रांच्या लोकांना जो मान व मोकळीक मिळते ती हिंदी लोकांनाहि मिळाली पाहिजे, असें समानत्व पत्करतांना हल्लींच्या सामाजिक व्यवस्थेत जे गुण आहेत ते तसेच राहू देण्याची खबरदारी घेतली पाहिजे. कारण निव्वळ सामानत्वामुळे पाश्चात्यांत अनेक दोष उत्पन्न झाले आहेत ते आपण टाळले पाहिजेत. या प्रमाणे साम्राज्याचा भागीदार म्हणून हिंदी राष्ट्र व्यवहारांत दक्ष, समाजव्यवस्थेत पूर्ण व राजकारणांत स्वतंत्र असे व्हावे व त्याला त्याच्या स्वतःच्या मताशिवाय बाहेरचा कोणीहि 'नाहीं होय,' म्हणू शकू नये किंवा याबाबत त्याला दुसऱ्या कोणाच्या तोंडाकडे पहावें लागूं नये अशी व्यवस्था झाली पाहिजे, या गोष्टी होण्यासाठी पहिल्याने लोकांना जुटीने व सलोख्याने काम करण्याची पद्धतशीर संवय लागली पाहिजे व सरकारने या कामीं मनःपूर्वक व लक्ष लावून हिंदी जनतेस मोकळ्या हाताने मदत केली पाहिजे, या गोष्टी साधण्याच्या कामी आपण तत्काळ लागले पाहिजे.