पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रारंभीचा खटाटोप २ या निर्णयाप्रमाणे जरूर ते कायदे करून त्यांची अंमलबजावणी करणे __ हे काम दुसऱ्या वर्गाकडे. __३ हे निर्णय अंमलात आणण्यासाठी लागणारे द्रव्य पुरविण्याचे काम तिसऱ्या वर्गाकडे. ४ वर लिहिलेल्या तिन्ही वर्गाचे दिमतीस राहून ते सांगतील तें काम करणारे नोकर पुरविण्याचे काम चवथ्या वर्गाकडे. याप्रमाणे राष्ट्रांतील कोणत्याही एका वर्गाकडे पूर्ण सामर्थ्य राहूं नये व जे होणें तें चारी वर्गाच्या सहकार्याने व्हावे अशी योजना नव्या व्यवस्थेत असली पाहिजे, दरसाल हिंदुस्थानांत दहा कोटींपासून तीस कोटीपर्यंत कर्ज शिक्षण व उद्योग धंदे या कामासाठी काढावे. प्रत्येक प्रांतिक संस्थानाने आपल्या प्रांतापुरतें कर्ज आपल्या प्रांतांत उभारावे व त्याच्या फेडीची व्यवस्था देखील आपली आपण करावी. हे कर्ज तीस ते पन्नास वर्षांत फेडावे व हे फेडण्यासाठी व व्याजासाठी दरसालचा हप्ता सालोसालच्या साऱ्यांतून देण्यात यावा. याप्रमाणे ही कर्जफेडीसाठी लागणारी रक्कम फार मोठी होणार नाही व ही प्रांतिक संस्थानाला सहन करण्यासारखीच राहील, याप्रमाणे तीस किंवा पन्नास वर्षांत देशांत इतकी सुधारणा व संपन्नता येईल की हे कर्ज त्यावेळी सहज फेडतां येईल, उद्योगधंदे हे राष्ट्राचा जीव की प्राण असून शिक्षण हा त्याचा पाया आहे. या दोन्ही बाबींकडे गेल्या शंभर वर्षांत फार दुर्लक्ष झाले आहे व ही जी मोठी चूक झाली त्या चुकीचे प्रायश्चित म्हणून आपण या कामी बिलकूल आळस अगर कसूर करता कामा नये. लोकांनी स्वावलंबनाने या कामी लक्ष घालून कसे काम करावे याचें दिग्दर्शन वर आले आहेच व याचा सविस्तर तपशील पुढे निरनिराळ्या प्रकरणांत येणार आहे. संघस्थापनेपासून कामाला सुरवात होऊन तें काम वाढत वाढत सर्व देश व त्याचे सर्व अवयव व्यापून राहिले पाहिजे. या जाळ्यांत कामांचे सर्व प्रकार व त्यांचा सर्व देशापर्यंतचा व्याप आला पाहिजे, सारांश एका बाजूने सरकार व दुसऱ्या बाजूने लोकांचे संघ यांनी हे राष्ट्रकार्य उचलून धरले पाहिजे म्हणजे हे काम उत्तम व लवकर होईल.