पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०३ मध्यवर्ती सरकार व प्रांतिक संस्थाने यांच्या दिमतीस सुधारणामंडळे व सुधारणामंत्री असावेत, या मंत्र्यांनी सुधारणांसाठी लागणारी माहिती गोळा करणे त्या माहितीचा विचार करणे व निर्णय ठरविणे, निर्णय अमलांत आणून त्यांत दुरुस्या सुचविणे वगैरे कामे करण्यासाठी तज्ञ मंडळी नेमावी व या मंडळीच्या सल्ल्याने हळूहळू सुधारणा अमलांत आणाव्या. या सुधारणांसाठी लागणारे पैसे कसे मिळवावे, कोणत्या खात्याकडे कोणती सुधारणा अंमलबजावणीस द्यावी, वगैरे मुद्यांवर लोकांकडून सुधारणासाठी सूचना मागवाव्या, व ज्या योगे सुधारणा लवकर व पूर्णफलदायी होतील अशा सर्व गोष्टींसाठी तज्ञ पुढाऱ्यांची मंडळे नेमावी. मध्यवर्ती सरकार व प्रांतिक संस्थाने यांत उत्पादक मंत्रिमंडळ निवडले पाहिजे. कोणच्या प्रदेशांत काय उत्पन्न करता येईल, ते उत्पन्न करण्यास लोक कसे तयार करावे व या उत्पन्न झालेल्या मालाचे काय करावे याचा विचार व त्याप्रमाणे काम या उत्पादनखात्याने करावयाचे असावे. या मंडळाने सर्व देशाची पहाणी करून या देशांत कोणकोणत्या प्रकारची संपत्ति, किती व कोठे आहे याची माहिती गोळा करावी, व लोकांत कामें करण्याची शक्ति व ज्ञान किती आहे, यांचे टिपण करावें.. मग या दोहोंचा नीट उपयोग करून देशांतील संपत्तीचा योग्य उपयोग व फायदा लोकांस घेता येईल अशी व्यवस्था करावी. ज्यांना उद्योग नसेल अशांना उद्योग लावून देणे, जे कामें करीत नसतील त्यांना कामें करावयास लावणे व कामे करणारांना त्यांच्या कामास लागणारी मदत करणे ही या उत्पादनमंडळाची मुख्य कामें होत. वर लिहिलेल्या दोन्ही म्हणजे सुधारणामंडळ व उत्पादनमंडळ या दोन्ही संस्था फक्त माहिती गोळा करणे, विचार करणे व निर्णय ठरविणे याच कामासाठी उत्पन्न करावयाच्या, अंमलबजावणीचे किंवा जरूर ते कायदे करण्याचे काम यांचे नाही; ही कामें सरकारी नोकर व लोकप्रतिनिधि यांची होत. तात्पर्य, नव्या रचनेत चातुर्वर्ण्य संस्था प्रस्थापित झाली पाहिजे ती अशी:१ माहिती गोळा करणे, विचार करणे व निर्णय ठरविणे हे काम एका वर्गाकडे, मा .