पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रारंभीचा खटाटोप लोकांना भांडवलाच्या कामांत बरीच मदत होईल व त्याचा मोबदला देखील इंग्रज भांडवलवाल्यांना मिळेल, याप्रमाणे हिंदुस्थानांतून जे द्रव्य इंग्लंडला मिळेल त्या द्रव्याचे इंग्रज लोकांनी अमेरिका आस्ट्रेलिया वगैरे देशांतून धान्य खरेदी करावें, पण या धान्यखरेदीसाठी हिंदुस्थानांतील उद्योगधंद्यास वाढू देऊ नये, त्यांच्या उत्पत्तीस अनेक अडथळे उत्पन्न करावे, त्यांच्या मालावर गैरवाजवी कर बसवून अयोग्य स्पर्धा करावी हे वाजवी नाही. हिंदुस्थानांतील प्रांतांची निरनिराळी संस्थाने करावी. एक भाषा, समान आचारविचार व एक परिस्थिति असणाऱ्या सरासरी एक कोट लोकांचे एक संस्थान करावें. अशी संस्थाने झाली म्हणजे वर लिहिल्याप्रमाणे शिक्षण, धंदे, व्यापार वगैरेंची वाढ व सुधारणा करण्यापुरते त्यांचे उत्पन्न होईल. थोड्या उत्पन्नाच्या लहान संस्थानांना ही कामें नीट व फायदेशीर रीतीने करता येणार नाहीत. हिंदुस्थानांत खेडेगांवांतून लोकसंख्या हल्लीच्या तेथील कामांच्या मानाने जास्त आहे. या जास्त लोकसंख्येस तेथेच कारखाने काढून कामांत गुंतविले पाहिजे. या लोकांना मोठमोठ्या शहरांत एकत्र आणण्याने अनेक प्रकारचे तोटे होतात असा इतर देशांचा अनुभव आहे. या अनुभवाने आपण शहाणे झाले पाहिजे. यासाठी दरएक तालुक्यांत एकादाच मोठा कारखाना चालू द्यावा. त्या कारखान्याच्या लोकांसाठी तेथेच स्वतःचे गांव वसवावे. ज्या ठिकाणी ज्या कामाची सोय असेल त्या ठिकाणी त्या कामाचे कारखाने काढावे, पण हे कारखाने पसरून पसरून अलग अलग असावे. खेडेगांवच्या दोनअडीच हजार लोकसंख्येला एक गांवपंचायत असावी. या गांवपंचायतीने या लोकसंख्येचे सर्व प्रकारचे सार्वजनिक काम करावें. ही गांवपंचायत म्हणजे खेडेगांवचे सरकारच; या सरकारांत प्रातनिधिमंडळ, काम करणारे नोकर, शिक्षण वगैरे संस्था, व सुधारणामंडळ यांचा समावेश व्हावा, हल्ली तालुका लोकलबोडाकडे जी कामें असतात त्याच प्रकारची कामें या गांवपंचायतीकडे राहतील. मात्र दिवाणी व फौजदारी ही कामें देखील त्या भागापुरती या संस्थानाकडे देण्यांत येऊन योग्य माणसांची निवड त्या कामासाठी यांनी करावी व जोपर्यंत ती माणसे आपले काम चोख रीतीने करतात तोपर्यंत त्यांस कोणी कामावरून बडतर्फ करूं नये असा नियम असावा.