पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० ३. ठेवलेला आहे हे लक्षात ठेऊन आपले काम अत्यंत दक्षतेने केले पाहिजे. या उद्योगधंदे वगैरेच्या उन्नतीसाठी पाहेल्याने देशांत किती संपत्ति आहे तिची खानेसुमारी केली पाहिजे. प्रत्येक इसमाचे उत्पन्न किती, खर्च किती व त्यापाशी त्यापैकी किती रक्कम व्यापार वगैरेत घालण्यासारखी आहे याची माहिती व्यापारी संघाने गोळा करावी. तसेच प्रत्येक धंदा किंवा उद्योग करणाऱ्या लोकांच्या संघाने तो तो उद्योगधंदा ऊर्जित दशेस कसा आणावा, त्याला किती भांडवल लागेल, काय नफा राहील वगैरे माहिती तयार करावी व यावरून देशाची स्थिति आपल्या कार्याला किती अनुकूल आहे याचा आढावा प्रसिद्ध करावा. प्रत्येक संघाच्या सभासदांनी आपली संपत्ति त्याचे संघाच्या कार्याकडे खर्च करावी म्हणजे आपला पैसा कोणालाहि गैरवाकब व गैरमाहीत माणसाचे स्वाधीन करावा लागणार नाही. वर सांगितलेल्या सर्व गोष्टी हो यासाठी सरकार व जनता यांच्यांत पूर्ण विश्वास व एका असली पाहिजे. असे होण्यास मध्यवर्ती सरकार व संस्थाने ही सर्वथैव प्रातिनिधिक व पूर्ण सत्ताधारी झाली पाहिजेत. जमाखचांच्या बाबद प्रत्येक संस्थानाला पूर्ण स्वायत्तता हवी. या सर्व गोष्टींचा पाया म्हणजे सरकार हे लोकांसाठी, लोकांचे कल्याण करण्यासाठी, आहे ही गोष्ट सरकार व लोक यांना मान्य झाली पाहिजे व या सरकारचे काम म्हणजे हिंदी जनतेचे कल्याण करण्याचे काम सर्वांनी अगदी मनोभावाने व दुसरा कोणताहि विचार मनांत न आणतां करण्यासाठी झटले पाहिजे. ही गोष्ट करण्यांत जर थोडी चूक झाली किंवा कसूर करण्यांत आली तर सर्व कामाचा बेरंग होईल. इग्लंड देशाला हिंदुस्थानांतून धान्य पाहिजे व ते धान्य इंग्लंडांत उत्पन्न होणाऱ्या लोखंड वगैरे जिनसांच्या मोबदला पाहिजे ही गोष्ट हल्ली हिंदुस्थानाच्या प्रत्येक सुधारणेच्या आड येते. हिंदुस्थानांत कारखाने काढणे, त्यांना ऊर्जित दशेला आणणे या कामी जर इंग्लिश लोक झटू लागले तर या झटण्याचा मोबदला त्यांना अनेक रूपाने हिंदुस्थानातून मिळेल. हिंदुस्थानांतून खंडणी म्हणूनसुद्धा काही रक्कम इंग्लंडनें त्याजपासून घेतली तरी चालेल पण हल्लींची हिंदुस्थानची कुचंबणूक फार जाचक आहे. इंग्रजी भांडवल व भांडवलवाले हिंदुस्थानांत येऊन हिंदी लोकांशी मिळून मिसळून काम करू लागले तर हिंदी