पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रारंभीचा खटाटोप ‘णारा पैसा हलक्या दराने व मुबलक उसनवार मिळेल व त्याचे सर्व प्रकारे कल्याण होण्यास मदत होईल. हल्लींच्या सोसायट्यांचे काम याप्रमाणे पद्धतशीर व सवलतीने होत नाही. दरएक संस्थानाने याशिवाय दरएक जिल्ह्यांतील दहा दहा शेतकरी व एक दोन शेतकी पदवीधर परदेशची शेतीची व्यवस्था पाहण्यासाठी आपल्या खर्चाने यूरोप, अमेरिका, जपान, वगैरे देशांत पाठवावे. जो कोणी जे काही पहाण्यासाठी किंवा शिकण्या-साठी परदेशी पाठवावयाचा तो हिंदुस्थानांतला त्या कामाचा काम करणारा माहितगार असला पाहिजे. धंदा करणारा कारागीर व उद्योग करणारा व्यापारी अगर शेती करणारा शेतकरी यास परदेशी पाठवावें. या दहावीस इसमांबरोबर त्या शास्त्राचा एक देशी पदवीधर दुभाष्या म्हणून असावा. परदेशांत गेलेल्या हिंदुस्थानांतील व्यापारी वगैरेना मदत करण्यास, त्यांस भांडवल वगैरे पुरविण्यास देशी वकील व देशी पेढ्या सर्व परदेशीय राजधान्यांतून असावेत. हिंदुस्थानांतील प्रमुख शहरांतून परदेशी भाषांच्या शाळा उघडाव्या व हिंदी राहणीस अनुसरून सोय करणाऱ्या हिंदी आगबोटी हिंदी लोकांच्या सोईसाठी व व्यापारासाठी चालवाव्या. हिंदुस्थानांतील लोकांस माहिती व्हावी म्हणून परदेशी गेल्यावर तेथें हिंदी लोकांनी को वागावे, निरनिराळ्या देशचे रिवाज, आचार, विचार, धर्म, व्यापार, व्यवस्था वगरेची माहिती देणारी पुस्तकें हिंदुस्थानांत हिंदी भाषांत प्रसिद्ध करण्यांत येऊन वाचनालयांत ठेवावी. व्यापारासाठी भांडवल पुरविण्याचे काम एका मोठ्या मध्यवर्ती पेढीकडे देऊन तिच्या शाखा प्रत्येक जिल्ह्याचे जागीं असाव्या. प्रत्येक जिल्ह्यास शिवाय धंद्यांना भांडवल पुगविणारी पेढी व शेतीला भांडवल पुरवणारी पेढी अशा दोन पेढ्या पाहिजेत, मोठ्या लोकांनी आपले पैसे दागदागिन्यांत न घालतां या पेढ्यांतून ठेवावे व पेढीत ठेवलेल्या पैशावरून त्या इसमाची योग्यता ठरविण्यांत यावी. दरएक हिंदी गृहस्थाने हिंदुस्थान देशाची गरिबी आहे हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे आपली राहणी साधी ठेवली पाहिजे व चैनीकडे खर्च होणारा सर्व पैसा देशाच्या उन्नतीसाठी या पेढ्या ठेवून देशकार्याला मदत केली पाहिजे. पेढी चालविणाऱ्या माणसांनी, लोकांनी त्यांकडे ठेवलेला पैसा किती स्वार्थत्यागपूर्वक