पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० भावी हिंदी स्वराज्य [प्र० ३ कारखानदार, उत्पादक, चालक, व्यवस्थापक कामगार, देखरेख करणारे व नोकर तयार करावे. खाजगी माणसांत वर लिहिलेले गुण सांपडले तर त्यांना लागेल ते भांडवल वगैरे देऊन कारखाने काढण्यास व चालविण्यास उत्तेजन द्यावे, त्यांच्या कारखान्यावर संस्थानची देखरेख असावी. चूक होईल तेथे त्या इसमास योग्य सल्ला व इषारा मिळावा व तो कारखाना योग्य त-हेने भरभराटीस यावा अशी सर्व व्यवस्था संस्थानच्या तज्ञांनी करावी, सार्वजनिक पुढाऱ्यांनी देखील ही कामें फुकट करावी व पुढाऱ्यांना कारखाने पहाण्याची सवड कायद्याने द्यावी. कारखान्यांना परदेशी मालाच्या स्पर्धेपासून त्रास होऊ नये म्हणून परदेशी मालावर जकात ठेवावी, याप्रमाणे दहापांच वर्षे काळजीपूर्वक व पद्धतशीर जोपासना देशी कारखाने वगैरेची केली तर हिंदुस्थानाचा रंग सहज पालटून जाईल. लष्करी खर्चाकडे जे अनेक कोट रुपये खर्च होतात त्यांपैकी काही कोट रुपये सरकारने या कामी खर्च केले तर चांगलेच होईल; पण सरकार असें न करील तर लोकांनी खाजगी संपत्तीवर तुळशीपत्र ठेवून हे काम केले पाहिजे. आपल्या पूर्वजांनी आपआपसांत भांडून व अनेक दुष्कर्मे करून जो पापसंचय केला त्याचे हा स्वार्थत्याग म्हणजे योग्य प्रायश्चित्त होईल. शेतीत देखील योग्य खतें घातली व शास्त्रीय पद्धतीने ती केली तर शेतीचे उत्पन्न पुष्कळ वाढेल. शेतीसाठी पाणी पुरवठ्याकडे जितका पैसा खर्च करावा तितका तो सार्थकींच लागणार आहे. तलावांच्या पाण्यावर वीज वगैरे उत्पन्न करून मग ते शेतीकडे वापरले तर त्याचा दुहेरी उपयोग होईल, हिंदुस्थानांतील शेतकऱ्याला यंत्रांची जोड, खतांची जोपासना व गुरे वगैरेचा उपयोग या बाबींत पुष्कळ शिकण्यासारखे आहे. प्रत्येक शहर व तालुका या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पतपेढ्या असाव्या. या पढ्यांनी दुहेरी काम करावे. शेतकऱ्याचा माल खपविण्यास अडते व शेतकऱ्यांच्या गरजा पुरविण्यास पेढ्या अशी दोन कामें या संस्थांनी उचलली तर शेतकऱ्याला आपले सर्व लक्ष व सगळा वेळ शेतकामाकडेच ट्रेण्यास बरें पडेल, त्याला लागणाऱ्या जिनसा स्वस्तांत स्वस्त मिळून त्याचा माल महागांत महाग विकण्याची सोय होईल व त्यास लाग