पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रें.] प्रारंभीचा खटाटोप आहे व या सुधारणा करतांना लोकांनी ज्या चुका केल्या त्या चुका आपणास सावधगिरीने टाळण्यासाठी त्यांचे अनुभव आपणांस उपयोगी पडणार आहेत, शहाणा व मूर्ख यांतील फरक म्हणजे हाच की. शहाणा पुढच्याला लागलेल्या ठेचनें सावध होतो व मूर्ख तसें करीत नाही. देश संपन्न होण्यासाठों हिंदुस्थानांतून परदेशी जाणारा सर्व कच्चा माल हिंदुस्थानांतच पक्का झाला पाहिजे. यासाठी हिंदुस्थानांत मोठमोठ्या गिरण्या काढाव्या लागल्या तरी हरकत नाही. अशा गिरण्यांच्या योगाने त्या गिरण्यांना सामान पुरविण्याचे देखील लहान मोठे कारखाने देशांत उत्पन्न होऊन चालतील, रेलवेला लागणारे सामान, यंत्रे, मोटारयंत्रे, कागद, तेल गाळणे, चिनीमातीचे काम, कांचकाम व कांतडी रंगविणे इतके कारखाने दर संस्थानास एक एक तरी पाहिजेत. समुद्रकिनाऱ्याचे दरएक जिल्ह्यास गलबतें बांधण्याचा कारखाना, कापूस पिकणाऱ्या दरएक जिल्ह्यांत सर्व कापूस वापरण्याइतक्या कापडाच्या गिरण्या व लोखंड निघणाऱ्या प्रांतांत हिंदुस्थानाला पुरेल इतके लोखंड गाळण्याचे कारखाने निघाले पाहिजेत. .. हिंदी व परदेशी तज्ञांचे एक मंडळ सगळ्या हिंदुस्थानांतील कारखान्यांची नीट व्यवस्था लावण्यासाठी नेमावे, या मंडळाच्या सल्ल्याप्रमाणे प्रत्येक संस्थानाचे उद्योगखात्याच्या मंत्र्याने काम करावे. दरएक संस्थानाने दरसाल एक कोट रुपये या उद्योगधंद्यांच्या वाढीच्या कामी दरसाल खर्च करावे. हा खर्च दहा वर्षांत एक कोटीवरून तीन कोटींपर्यंत वाढवावा. जसजसे एक एक कारखाने सुरू होऊन कामे करूं लागतील त्याप्रमाणे त्याला जास्त खर्च लागेल, यासाठी हा वाढता खर्च ठेवला आहे. काही कारखाने विविक्षित प्रौढत्वाला पाँचले म्हणजे ते आपल्या पायावर चालू लागतील. या उद्योगखात्याचा खर्च संस्थानाच्या कायदेमंडळाच्या देखरेखी खालीं व्यापारी दृष्टीने व्हावा, पण खाजगी कारखान्यांना यांतून काही रक्कम मदतीदाखल फुकट देण्यास हरकत असू नये, किंवा खाजगी कारखान्यांच्या व्याजाची हमी संस्थानाने घ्यावी. याशिवाय कारखान्यांना जोडून शोधमसंस्था, प्रयोगशाळा, कल्पकगृहे, शिक्षणालये व सुधारणामंडळे वगैरे संस्था असाव्या व त्यांनी प्रयोग करून तज्ञ व भा...हिं...स्व...४