पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० ३ शिक्षण देऊन उपयोगांत आणावे. विद्वान् लोकांनी दिवसाकाठी तास दोन तास या सार्वजनिक कामाकडे वापरावे. धनिकांनी अवश्य ती उपकरणे विकत घेऊन द्यावी. इतकेच नव्हे तर म्युनिसिपालिट्या, लोकलबोर्डसारख्या संस्थांना कर वाढविता येत नसले तर त्यांनी पैसे कर्जाऊ काढावे. रूसो-जपानी युद्धाच्या वेळी जपानांतील बायकांनी आपल्या अंगावरील दागिने काढून लढाईच्या खर्चासाठी सरकारच्या स्वाधीन केले होते; मग सार्वत्रिक सक्तीच्या सुंदर शिक्षणासाठी हिंदी कुलस्त्रिया या कामी मागे राहतील हे संभवनीय नाही. ज प्रत्येक हिंदी संस्थानाने आपल्या भाषेत ज्ञान देणारे एक तरी स्वतंत्र विद्यापीठ व त्याला जोडून एक तरी धंदेशिक्षणाचे महाविद्यालय व व्यापारी महाविद्यालय काढावें. साधारणपणे दर एक कोटी लोक . संख्येला असले एक विद्यापीठ पाहिजे. या विद्यापीठांत त्या संस्थानाच्या देशभाषेत सर्व प्रकारचे अत्युच्च व संपूर्ण शिक्षण मिळण्याची सोय झाली पाहिजे. याप्रमाणे सर्व हिंदुस्थानांत मिळन पांच वर्षांत वीस तरी विद्यापीठे निघाली पाहिजेत. विद्यापीठांत पदवी घेणाऱ्या प्रत्येक विद्या र्थ्याला अर्थशास्त्र व नागरिकांची कर्तव्ये हे विषय अवश्य शिकविले पाहिजेत. असे झाले म्हणजे खरे पुढारी, उत्तम संस्थास्थापक, निष्णात राजकार्य धुरंधर पुरुष हिंदुस्थानांत हल्ली फार दुर्मिळ आहेत त्यांचा पुरेसा पुरवठा होईल. दर कोट लोकसंख्येमागे पन्नास विद्यार्थी जर्मनी, जपान वगैरे परदेशांत निरनिराळ्या शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी पाठवावे. तसेच तिकडील तज्ञ लोक येथे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने आपले विद्यार्थी तयार होऊन येईपर्यंत नोकर ठेवावे. परदेशी पाठविलेल्या हिंदी विद्यार्थ्यांपैकी पदवीधर होऊन यतील त्यांना त्या संस्थानाने पोसावें व इतांना थोडी फार लागेल ती मदत द्यावी. याशिवाय संस्थानाने आपल्या विद्वान् पुढाऱ्यांना परदेशी संस्थांची पहाणी करण्यासाठी, त्यांचा स्नेह सपादन करण्यासाठी व परस्परांना एकमेकांची माहिती पुरवण्यासाठी वरचेवर पाठवीत जावें. परदेशांतील राज्यपद्धति, व्यापारधंदे संस्था वगैरेंची सांगोपांग माहिती आपल्या तसल्या संस्था सुधारण्याच्या कामी फार उपयोगी पडणार