पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रारंभीचा खटाटोप ४७ आली व उद्योगधंद्यांवर निम्मे लोक लावतां आले तर हे उत्पन्न निदान दिढी तरी होईल व ते लोक सुखी होऊन पुष्कळ सामर्थ्यवान होतील, अशा त-हेनें हिंदुस्थानांतील निम्मे लोकांना उद्योगधंद्याला लावावयाचे म्हटले म्हणजे पहिल्याने सर्व लोकांना साक्षर केले पाहिजे व त्यांना व्यवहारोपयोगी असें हस्तकौशल्य व यंत्रे वापरण्याचे शिकविले पाहिजे. या गोष्टी कशा कराव्या हे या पुस्तकांत पुढे सविस्तर प्रतिपादन केले आहेच, पण या बाबींचा मूलभूत विचार या ठिकाणी या भागांत करावयाचें योजिले आहे, शिक्षणाचा प्रारंभ पुरेशा प्राथमिक शिक्षणाच्या शाळा काढून देशांतील आठ ते बारा वर्षांच्या सर्व मुलांना व मुलींना सक्तीने शिकविण्यापासून केला पाहिजे. साधारणपणे गांवच्या लोकसंख्येपैकी शेकडा पंधरा जणांना तरी शिकविण्याची सोय प्रत्येक गांवांत या सक्तीच्या शिक्षणासाठी केली पाहिजे. शहरांमध्ये यापेक्षांहि जास्त लोकसंख्येच्या शिक्षणाची सोय केली पाहिजे. अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या माणसांना पोटापाण्यासाठी काम करावे लागत असल्यामुळे त्यांनी दर आठवड्यांत केव्हां तरी सहा तास काही तरी हस्तकौशल्य संपादन केले पाहिजे असा नियम करून त्यासाठी लागणारी व्यवस्था केली पाहिजे. अशा तरुण माणसांना उद्योगधंदा येत असला तर त्यांना लिहण्यावाचण्यास रात्रींकरितां शिकण्याची सोय करावयाला पाहिजे. या अक्षरओळख व हस्तकौशल्याशिवाय होती व धंदे यांत हमेश उपयोगी पडणारे व्यावहारिक शास्त्रीय ज्ञान, थोडा जमाखर्च व जगातील पैशाच्या उलाढाली कशा होतात व हिंदुस्थानांत त्याबाबद काय व्यवस्था आहे इतकी अर्थशास्त्राची सामान्य माहिती, नागरिकाच्या कर्तव्यासंबंधाने स्थल उपपत्ति, इतके ज्ञान प्रत्येक प्राथमिक शाळेत विद्या र्थ्यांना अवश्य मिळाले पाहिजे, या कामी शिक्षक तयार करणे, जरूर ती उपकरणे पुरविणे व शिक्षणासाठी शालागृहे बांधणे यांना बराच खर्च लागेल खरा; पण हा खर्च म्हणजे अत्यंत अवश्य गोष्ट आहे म्हणन घरांतील दागिने मोडून सुद्धा करणे भाग आहे. या कामी जितकी काटकसर होईल तितकी करावी. उदाहरणार्थ, शालागृहाऐवजी नुसते मांडव किंवा छपरे घालावी. शिक्षकांसाठी भिक्षुक, कुळकर्णी, वगैरे माणसांना जरूर तें