पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जा प्रकरण तिसरे प्रारंभीचा खटाटोप कोणतेहि काम शेवटास न्यावयाचे म्हटले म्हणजे त्याला पांच गोष्टी लागतात. हिंदी अर्थशास्त्रकारांनी त्या पांच गोष्टी खालीलप्रमाणे सांगितल्या आहेत: १ कर्मणां प्रारंभोपायः-कामाच्या सुरुवातीस करावी लागणारी 7 खटपट किंवा जुळवाजुळव . २ पुरुषद्रव्यसंपद् – त्या कामासाठी लागणारी माणसें व पैसे, ३ देशकालविभाग–कामाची देशाच्या व वेळाच्या संबंधाची वाटणी. को ग त्या ठिकाणी कोणत्या वेळी किती काम करावयाचे याचा निश्चय. ४ विनिपातप्रतिकार--कामांत होणाऱ्या चुका व येणारे अडथळे यांचे निरसनाचा उपाय. ५ कार्यसिद्धि-कामाच्या शेवटी करावी लागणारी निरवानिरव किंवा आवर आटोप. यापैकी आपण आतां या भागांत पहिल्या गोष्टीचे विवरण करावयाचे आहे. ____हिंदुस्थानांत सुस्थिति येण्यासाठी करावयाची पहिली गोष्ट म्हणजे येथील लोकांना पोटभर अन्न व अंगभर वस्त्र मिळेल अशी तजवीज करणे होय. हिंदस्थानांत हल्ली शेकडा ऐंशी लोक अन्नाची उपज करण्यांत शेतीच्याच कामांत गुतलेले असून त्यांना वर्षातून सहा महिने काम नसते, यासाठी या लोकांपैकी निदान निम्मे लोक शेतीवरून काढून उद्योगधंद्याच्या कामी लावले पाहिजेत. म्हणजे शेतकरी लोकांना वर्षभर काम मिळन निम्मे लोक दुसऱ्या रीतीने पोट भरूं लागतील, अशा रीतीने माणसाचे उत्पन्न वाढेल व मग पोटभर अन्न सर्वांना मिळेल. हिंदी लोक फार अल्पसंतुष्ट व मितव्ययी आहेत. माणशी अवघ्या पंचवीस रुपये दरसाल उत्पन्नांत ते आपला निवोह हल्लीं करतात व या उत्पन्नांत जर थोडीफार भर घालता