पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थानचे एकराष्ट्रीकरण येण्याची सोय मात्र नेहमी अशा घटनेत पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्य या नावाखाली हल्ली जो वाटेल तसा धुडगूस घालण्यात येतो त्याला आळा बसला पाहिजे, अशा अनियंत्रित वर्तनाने कोणाचा पायपास कोणाच्या पायांत नाही, अशी स्थिति होते. सामान्य जनतेची प्रवृत्ति फाटाफुटीकडे जास्त असते. वैयाक्तिक विशिष्टत्व प्रत्येकाला प्रिय असते, पण या स्वातंत्र्याला समाजबंधन म्हणून काही तरी आळा पाहिजे व हा आळा म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे राष्ट्राने मान्य केलेला निर्णय, या बंधनाच्या आंत प्रत्येक व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. निरर्गल स्वातंत्र्य कोणालाहि केव्हांहि देता येत नाही. कायदे म्हणजे जसे व्यक्तीला एक बंधन आहे त्याचप्रमाणे वरील निर्णय हे देखील व्यक्तीला बंधन आहे व ते तिने कायद्याप्रमाणेच नेहमी निमूटपणे मान्य केले पाहजे.