पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०२ नाही. पुढे होणाऱ्या दरएक संस्थानांतील म्हणजे भाषा, आचार, पोषाक वगैरेंत एकवाक्यता असणाऱ्या प्रत्येक प्रदेशांतील प्रमुख विचार करणाऱ्या माणसांची एक सभा बोलावून तिने त्या प्रदेशा पुरता या बाबींचा सर्व बाजूनों विचार करावा व एक वर्षांत या प्रदेशांतील लोकांचे एकीकरण किंवा हिंदीकरण करण्यास काय करावे हे ठरवावे. या मंडळाने एक एक प्रश्न दहापांच तज्ञांकडे विचारासाठी सोपवावा. हे तज्ज्ञ परप्रांतीय, परदेशीय असले तरी चालतील. मात्र त्यांचा निर्णय मंडळीला तज्ञांचा म्हणून कबूल आहे असे असले पाहिजे, या विचारपत्रिका व त्यांवरून मंडळाने ठरविलेले निर्णय हे मग त्या प्रदेशांत सर्वत्र प्रसिद्ध करावे, या गोष्टी सुंदर भाषेत व कवितेत ग्रथित केलेल्या असाव्या. म्हणजे त्या तोंडपाठ करून सर्व लोकांच्या तोंडी होण्यास बरे पडेल. याप्रमाणे प्रत्येक प्रांताने सुचविलेली योजना जरी त्या प्रांतापुरती असली तरी इतर प्रांतांच्या भाषेत या योजनच्या कविता प्रसिद्ध करण्यांत याव्या. तात्पर्य, प्रत्येक प्रांताचे या बाबींत काय म्हणणे आहे. कोणत्या सूचना सर्व प्रांतांना ग्राह्य वाटतात, कोणत्या -सूचना कोणत्या प्रांतास पटतात याबद्दल सर्व देशाला विचार करण्यास थोडा वेळ देऊन मग प्रत्येक प्रांताच्या सूचना त्या त्या प्रांतांत कायद्याने विविक्षित दिवसापासून अंमलांत याव्या असा हुकूम फर्मावावा. सर्व हिंदुस्थानभर या सूचना एकदांच अंमलांत आल्या तर फार सोईचे होईल. बली, राम, अशोक वगैरे प्राचीन राजांनी याच रीतीने त्या त्या काळाला अनुरूप अशा गोष्टी अमलात आणल्या होत्या व तोच मार्ग आतांहि अमलांत आणणे जरूर आहे. या सूचनांचा पहिल्याने दरसाल फेरविचार करावा. बहुधा पहिल्या तीन वर्षांच्या अनुभवानंतर त्यांत फरफार करण्याचा प्रसंग येणार नाही. कालाची गति कुटिल असते यासाठी कालाशी मेळ ठेवण्यासाठी दर नऊ वर्षांनी याबाबद फेरफार करता येण्याची सोय सुचविली आहे. याप्रमाणे हिंदीत्व म्हणजे काय हे ठरल्यावर त्याप्रमाणेच सर्व लोकांनी वागावे. तसे वागण्यास संघ व लोकमत यांनी त्यांना भाग पाडावे. तसे वागण्यांत हित किती व अनहित किती व कसे हे जनतेला नेहमी समजावून देण्यासाटों व्याख्याने वगैरेची सोय ठेवावी. लोकांचे कल्याण व त्यांचे हित याकडे लक्ष देऊन फेरफार करतां