पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थानचे एकराष्ट्रीकरण हिंदुस्थानाची याप्रमाणे हिंदीकरणाची प्रगती लोकांना या बाबतीत जितका वाव व जितके प्रसंग मिळतलि व त्या प्रसंगांचा ते जितका फायदा घेतील त्यावर अवलंबून राहील. ही बाब सर्वथैव लोकोपयोगी व्यसून हिला इंग्रजसरकार मदतच करील अशी आशा करण्यास पुष्कळ जागा आहे, तथापि आपण सरकारच्या मदतीवर भार न घालतां अगर भिस्त न ठेवतां स्वतःच्या प्रयत्नावरच भिस्त ठेविली पाहिजे. जर नवीन संवयीं व व्यवस्था . अमलांत आणावयाच्या असल्या तर त्यांना काही तरी उत्तेजन पाहिजे ही गोष्ट कोणीहि नाकबूल करणार नाही. चिनांत अफ सोडील त्याला मताचा अधिकार देण्यांत आला; जपानांत लिहितां वाचता येईल त्यालाच मत देता येते व अधुनिक रशियांत हातांनी काम करील त्याला मात्र मत देण्याचा अधिकार ठेविला आहे. या भागांत ज्या गोष्टी प्रतिपादन केल्या आहेत त्यासाठी सक्ति करावी असे म्हटले म्हणजे कित्येकांना राग येईल; पण तो त्याचा रोष शिरसा मान्य करून या बाबी जरा सक्तीनेच पाहिल्याने अंमलात आणाव्या असे वाटते.कित्येकांना त्यांच्या नाविन्यामुळे या सूचना रुचणार नाहीत, कारण आपला हिंदी समाज फार गतानुगतिक आहे. अस्पृश्यता काढून टाकणे वगैरे . बाबतींत मोठा भ्रष्टाकार वाटेल असे म्हणण्यास हरकत नाही. परंतु कोणतीहि गोष्ट घेतली तरी तिला जगांत अनुकूल प्रतिकूल मते पडणारच, सर्वथैव वाईट किंवा सर्वथैव चांगली अशी कोणतीच गोष्ट जगांत नसल्याने काही लोक जे दोष दाखवितील ते खोटे नाहीत, हे कबूल करणे भाग आहे, पण हिंदुस्थानाची जर सर्वांगीण उन्नति व्हावी असे वाटत ८ सलें तर काही दोष पत्करून, थोडा जुलूम मान्य करून, किंचित् त्रास सोसून, काही कष्ट करून ही उन्नति घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यांत यश आल्यावर पुढील पिढी आपणांस दुवाच देईल, हे जाणून वरील सूचना केल्या आहेत. सर्व प्रकारच्या राजकीय विचार करणाऱ्या लोकांनी हिंदुस्थान स्वराज्याला लायक होण्यासाठी त्याची घटना सामाजिक, राजकीय, औद्योगिक वगैरे कशी बदलली पाहिजे याचा काळजीपूर्वक व कळकळीने विचार करावा. सर्व धंदेवाईक, समाजशास्त्रज्ञ, कायदेपंडित, शिक्षणाभिमानी, धर्मज्ञ, वगैरे प्रमुख मंडळींनी विचार करण्यायोग्य ही बाब आहे यांत संशय