पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र० २ वाहिजे. सुधारणा केल्या तर कारभार अधिक सुलभ व सुखकर होईल यांच्या कल्पना मागवाव्या. ७ पोषाकांत कांहीं तरी सर्वसामान्यत्व व वैशिष्टय असावें. डोक्यावर पागोटें, अंगांत लांब आंगरखा व खालीं धोतर अगर पोकळ विजार असा हा हिंदी पोषाक ठरविण्यासारखा आहे, व्यवहारांत सभ्यता व शिस्त असली पाहिजे. ८ लोकांत प्रवासाची आवड उत्पन्न व्हावी व त्यांचे दृष्टिक्षेत्र वाढावें म्हणून प्रवासाच्या सोईची गरीब व मध्यम वर्गाला सुखकर अशी वाढ व्हावी, ९ राष्ट्रीय हित साधण्यासाठी व राष्ट्राचा मान वाढावा म्हणून प्रत्येक नागारेकाने काय करावे याबद्दलच्या माहितीचा प्रसार व या का राष्ट्रीय ध्येयाला अनुसरून पुढाऱ्याचे वर्तन पाहिजे, १० सर्वसाधारण नागरिकांना संघाने कामें करण्याची सवय लावण्या___साठी उत्सवांची योजना, को ११ प्रमुख माणसांना परदेशांची माहिती व्हावी म्हणून आंतरराष्ट्रीय THA प्रदर्शने, खेळांचे सामने वगैरे इतर राष्ट्रांतील पुढाऱ्यांशी मिसळFECण्याची साधनें. सर्व नागरिकांना व्यक्तिशः व संघाने राष्ट्र कार्याची महती समजावी म्हणून प्रत्येकाला काही तरी धंदा अगर व्यवसाय असून त्यांत काम केल्याशिवाय त्याला सन्माननीयता येऊ नये असा निर्बध असणे इष्ट आहे. हातांनी कामे करण्याची लाज जी समाजांत दृष्टोत्पत्तीस येते ती घालविणे अत्यंत जरूर आहे. अकबर, औरंगझेव, जयसिंग, शिवाजीमहाराज वगैरे प्राचीन थोर पुरुषांची उदाहरणे सोडली तरी औंधकर प्रतिनिधि, राजा रविवर्मा वगैरे आधुनिक संस्थानिकांची उदाहरणे सगळ्यांनी अनुकरण करण्यायोग्य आहेत. पोट भरण्यासाठी नव्हे, पण छंद म्हणून, नाद म्हणून कोणत्या तरी विद्येचे व्यसन प्रत्येक सुखवस्तु माणसास असले पाहिजे. ला ला Tip