पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

_ हिंदुस्थानचे एकराष्ट्रीकरण ४१ - हिंदुस्थानाचे हिंदीराजकारण होण्यास खालील गोष्टी व्हावयाला पाहिजेत. आणि हिंदी लोकांच्या आचार विचारांत या गोष्टी दृष्टीस पडल्या पाहिजेत. १ आपल्या हिंदित्वाबद्दल व त्याच्या मानापमानाबद्दल योग्य अभिमान व चीड असून त्याबद्दल जरूर तो स्वार्थत्याग व कष्ट सोसण्याची तयारी. सर्व देशांत सर्वांना समजेल अशा हिंदी भाषेचा व लिपीचा प्रसार. या हिंदी भाषेच्या संस्कृत व फारशी ह्या जननी म्हणून त्यांचा योग्य मान. ३ कमीत कमी चार वर्षांचे सक्तीचे शिक्षण. यांत हिंदी व मातृभाषा यांचा अभ्यास व जमाखर्च, हिंदी राजघटना व भूगोल यांची माहिती, हिंदी थोर पुरुषांच्या चरित्रांची ओळख व शरीराचे सर्व अवयवांचा यथायोग्य उपयोग करण्याची संवय, इतके शिक्षण प्रत्येक मुलामुलीला मिळालेच पाहिजे. या शिक्षणाला प्रारंम सहा ते आठ वर्षांचे वय झाले की व्हावें. सहा वर्षांपासून खुषी व आठ वर्षांपासून सक्ति करावयाची. ४ काटकसर, कवाईत व नागरिकत्वाचे शिक्षण हे प्रत्येक शाळेत देण्यांत यावं. या गोष्टी प्रौढ माणसांनाहि शिकवण्याची पद्धतशीर व्यवस्था झाली पाहिजे, अशा रीतीने सर्व लहानथोर मंडळींना शिस्त व टापटीप यांचे वळण लाविले पाहिजे. ५ ज्या घामटपणाच्या व हलगर्जीपणाच्या संवयी हल्ली हिंदी लोकांत आहेत त्यांचा त्याग व ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन आरोग्य व स्वच्छता यांचा देशभर प्रसार केला पाहिजेत. ६ मुलांना कार्यकारण भावांचा विचार करणे व कल्पकता वाढविणे ज्यामुळे भाग पडेल अशा गोष्टी उच्च शिक्षणांत दाखल करणे व नित्याच्या व्यवहारांत या गोष्टी अंमलांत याव्या म्हणून सर्वत्र कल्पनांच्या पेट्या ठेवून त्या त्या बाबींच्या सुधारणा करणाऱ्या कल्पना वाढविल्या पाहिजेत. उदाहरणार्थ रेलवे, पोष्ट, कचेऱ्या, दुकानें वगैरेंत या कल्पनांच्या पेट्यांत त्या त्या कार्यात कोणत्या