पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भावी हिंदी स्वराज्य [प्र०२ एका कालों झाली, तिची फळे आपण चाखीत आहोत; तेव्हां आतां तरी असा आत्मघातकीपणा न करण्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे, अशी खबदारी न घेतली तर आपण हिंदी लोक नामशेष होऊन जाऊं. अनेक विध भाषा, धर्म, आचारविचार असलेल्या मिश्र समाजाचे एकीकरण, शिक्षण व शिस्त कितपत, कसें व किती दिवसांत करतां येईल याचे प्रयोग व विचार अमिरिकेतील संयुक्त संस्थानांत महायुद्धापासून चालू आहेत. महायुद्धाचा हा वणवा आपल्या देशांतहि पेटण्याचा संभव होता, ही जाणीव उत्पन्न झाल्याचे हे फळ असून या क्रियेला 'अमेरिकनायझेशन' असें नांव त्यांनी ठेवले आहे. यापुढे यूरोपंत दंगल माजली तर अमेरिकेने तटस्थ वृत्तीच ठेवण्याचे जे जाहीर केले आहे त्याचे देखील कारण हेच की, यामुळे आपल्या स्वतःच्या देशांत तसलीच दंगल माजण्याचा संभव त्यांना दिसतो. या लढाईत तरी इंग्लंड, फ्रान्स वगैरे देशांना कर्जाऊ दिलेले पैसे विजयी जर्मनी फेडण्याचे कबूल करणार नाही याच जाणीवेने आपल्या पैशाच्या संरक्षणासाठी अमेरिकेला दोस्तांची बाजू घ्यावी लागली. एरवी आपण केवळ तटस्थ रहावे असेंच अमेरिकन बहुजन समाजाचे मत होते. याच धोरणाने हिंदुस्थानांत देखील हिंदी म्हणविणागचा पोषाक, आवडनिवड, आचारविचार वगैरेंत एकवाक्यता व वैशिष्टय ठेवण्याचा व उत्पन्न करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पूर्वी हिंदुस्थानांतील अठरापगड समाजांत व संस्थानांत वैदिक धर्म, संस्कृत भाषा, पागोटें व धोतर हा पोषाक शेंडी व यज्ञोपवित ही खूण वगरे बाबींत एकवाक्यता व वैशिष्टय होते. मुसलमानी संयोगापासून ही घडी जी बिघडली ती अद्याप सुधारली नाहों. पण ही घडी सुधारली पाहिजे अशी जाणीव मात्र हल्ली हिंदुस्थानांत सर्वत्र पसरली असून अस्पृश्यतानिवारण पतितपरावर्तन, वगैरे गोष्टी या जाणिवेचींच दृश्यफले आहेत. अशा प्रकारची एकवाक्यता व वैशिष्टय असले म्हणजे त्याबद्दल प्रत्येकाला अभिमान वाटतो, इतर राष्ट्रांत त्याला योग्य मान असतो व सर्वजण या गोष्टींना सहानुभूतीपूर्वक पहातात अशी सर्व जगाला खात्री पटते, व असे झाले म्हणजे तो समाज एकराष्ट्र या नांवाला योग्य होतो.