पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थानचे एकराष्ट्रीकरण मात्र नाही. गेल्या महायुद्धांत युरोपियन राष्ट्रांनी आपसांत लढून युरोपखंड अमेरिकेच्या घशांत घालण्याची मजल आणलीच होती. पण थोडक्यांत सावध होऊन जर्मनीने लढाई बंद केली, म्हणून हे संकट टळले. तथापि युरोपांतील राष्ट्रांची एकमेकांविषयींची द्वेषबुद्धि या थराला गोष्टी नेणार नाही असे मात्र नाही. या गोष्टीला आज नुसती सुरुवात आहे व हिंदुस्थानाप्रमाणे ही स्थिति हजारपांचशे वर्षे राहिली तर युरोप कदाचित नामशेष सुद्धा होईल, यापासून योग्य तो धडा घेऊन परत्वर द्वेष करणे आपण साडले पाहिजे. - ही परस्पर द्वेषाची बुद्धि सर्वांनी सोडली पाहिजे. एका जातीने किंवा समाजाने हे काम करून भागणार नाही. अमेरिकेतील संयुक्त संस्थानांतहि हिंदुस्थान प्रमाणे अठरा पगड जाती, अठरा भाषा, अठरा धर्म, अठरा निरनिराळे समाज अशी स्थिति आहे पण त्यांनी ज्याप्रमाणे भेदभाव सोडून एकी टिकविली आहे, त्याप्रमाणे आपण केले पाहिजे. गेल्या महायुद्धांत यूरोपांतील यादवीच्या वेळी अमेरिकेत देखील यादवी माजेल असा जर्मन लोकांना भरवंसा होता व तसा प्रयत्नहि त्यांनी केला. पण अमेरिकेतील जर्मन लोकांनी आपल्या जातभाईस स्पष्ट सांगितले की, आम्ही अगोदर अमेरिकन व मग जर्मन आहो. अमेरिका में घोरण ठरवील त्याला बाध न आणतां आम्हांस जे करता येईल ते आम्ही करूं, आम्ही तुम्हांस मदत करूं ती येथपर्यंतच होईल. तुमच्या विरुद्ध प्रत्यक्ष लढण्यास आम्ही येणार नाही, पण यापलीकडे अमेरिकन धोरणाच्या बाहेर आम्ही पाऊल टाकणार नाही. अशी गोष्ट ऐकल्यावर जर्मन लोकांचा नाइलाज झाला व मग आपली ज्यास्त हान होऊ नये म्हणून त्यांनी लढाई बंद केली. अशी एकी महायुद्धांत अमेरिकेंत होती म्हणूनच मध्ये पडून अमेरिकेला यूरोपांतील लढाई बंद पाडतां आली, आयर्लंडच्या बाबतींत देखील अमेरिकने हेच धोरण ठेवले. अमेरिकेतील आयरिश लोकांनी व्यक्तिशः द्रव्याची वगैरे मदत आयलंदला केली पण इंग्लंद व आयर्लंदच्या दरम्यान अमेरिकेने राष्ट्र म्हणून बिलकुल ढवळाढवळ केली नाही. हा कित्ता हिंदुस्थानाने अक्षरशः गिरविण्यालायक आहे. "विनाशकाले विपरीत बुद्धिः” वाईट व्हावयाचे असले म्हणजे वाईट बुद्धि होते, त्याचप्रमाणे ती आपणास