पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ भावी हिंदी स्वराज्य [प्र०२ पहिल्याने स्वदेशी तयार करून मग अभ्यास करण्यासाठी पाठविली पाहिजेत. कोणा तरी धनिकाचा कसला तरी नातेवाईक कोठेतरी पाठवून उपयोगी नाही. निवडक माणसांना. नेमलेल्या कामाची किंवा विषयाची निवडक माहिती मिळविण्यासाठी विविक्षित देशांत पाठविले पाहिजे व ती माणसें जी माहिती आणतील ती एकत्र करून तिच्यांतील ग्राह्य अग्राह्य माहिती आपल्या परंपरेला व ध्येयाला अनुसरून ठरवून मग ती आपल्या सुधारणांच्या कामी काळजीपूर्वक वापरली पाहिजे. हिंदुस्थानाला पूर्वसंकृति असून ती फार प्राचीन असल्यामुळे घट्ट झालेली आहे, अशा संस्कृतीचे इष्ट रूपांतर सहज व सुलभतेने होणे अशक्य आहे ही गोष्ट जाणून कोणत्या धोरणाने कशा सुधारणा करीत जावे हे ठरवून त्याप्रमाणे त्या एकसूत्रीपणाने हळूहळू अमलांत आणल्या पाहिजेत. या कामी धोरण व सावधगिरी फार वापरली पाहिजे. मी याप्रमाणे हिंदुस्थानाने आपल्या परिस्थितीला व परंपरेला अनुसरून राष्ट्रीय भावनांचा परिपोष केला पाहिजे. जर कानडा, आस्ट्रेलिया वगैरेंप्रमाणे ब्रिटिश साम्राज्यांत अंतर्गत पूर्ण स्वातंत्र्य व बाहेरच्या शत्रू वगैरेशी वागण्यास ब्रिटन वगैरेंशी साहचर्य असावे असे जर हिंदी लोकांना वाटत असेल तर त्यांनी पहिल्याने आपली स्वतःची जूट करण्यास व हिंदुस्थानाचे कल्याण करण्यांत एकमेकांनी एकमेकांस मनोभावाने मदत करण्यास शिकले पाहिजे. आपला शेजारी मरत असतां स्वस्थ बसणे अशी जी त्याची आजपर्यंतची खोड आहे ती त्याने सोडली पाहिजे. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य जाण्याला एकमेकांविषयी निष्काळजीपणा-नव्हे एकमेकांविषयीं द्वेषचसर्वथैव आजपर्यंत कारणीभूत झाला आहे. मराठी साम्राज्यांत शिंदे लढूं लागले म्हणजे होळकर मजा पाहात, होळकर लहूं लागले म्हणजे भोसले तटस्थ असत, भोसल्यांचे राज्य घालविण्यास गायकवाड मदत करीत व गायकवाडांशी भांडणांत पेशवे पुढाकार घेत. टिपूला बुडविण्यासाठी निजाम, पेशवे व इंग्रज एक झाले होते व अशा रीतीने एकमेकांशी वर, तटस्थवृत्ति निष्काळजीपणा यांनीच इंग्रज सरकारला हिंदुस्थान काबीज करण्यास मदत केली आहे. दोघांचे भांडण व तिसऱ्याचा लाभ या म्हणीचे या प्रमाणे हिंदुस्थानांत प्रत्यंतर आले आहे. ही स्थिति हिंदुस्थानांत च आहे असे